डॉक्टरांची खिल्ली उडवली, बाबा रामदेव यांच्यावर तातडीने कारवाई करा, IMAचे उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

आधी अॅलिओपॅथी, नंतर डॉक्टरांची खिल्ली उडवणं योग गुरु बाबा रामदेव यांना महागात पडण्याची शक्यता आहे. (IMA writes to Uttarakhand CM, seeks action against Baba Ramdev)

डॉक्टरांची खिल्ली उडवली, बाबा रामदेव यांच्यावर तातडीने कारवाई करा, IMAचे उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना पत्र
रामदेव बाबाच्या कंपनीने केली ही कमाल, गुंतवणूकदारांना मिळवून दिला 1000 कोटींचा नफा
Follow us
| Updated on: May 25, 2021 | 5:35 PM

डेहराडून: आधी अॅलिओपॅथी, नंतर डॉक्टरांची खिल्ली उडवणं योग गुरु बाबा रामदेव यांना महागात पडण्याची शक्यता आहे. रामदेव बाबांच्या या वक्तव्याला इंडियन मेडिकल असोसिएशन उत्तरांचल राज्य ब्रँचने (IMA) जोरदार आक्षेप घेतला आहे. IMAने उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांना पत्रं लिहून बाबा रामदेव यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. (IMA writes to Uttarakhand CM, seeks action against Baba Ramdev)

कोरोनाच्या पहिल्या लाटेत 153 डॉक्टरांना आपला प्राण गमवावा लागला. दुसऱ्या लाटेत 452 डॉक्टरांचा मृत्यू झाला. अशात बाबा रामदेव यांचं विधान योग्य नाही. त्यांच्या या विधानाप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी IMAने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. रामदेव यांच्या या वक्तव्याने डॉक्टरांचं मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पूर्ण निष्ठेने काम करणाऱ्या डॉक्टरांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनीही रामदेव यांना पत्रं लिहून त्यांच्याकडून खुलासा मागितला आहे. याकडेही या पत्रात लक्ष वेधण्यात आलं आहे. रामदेव यांच्यावर कठोर कारवाई होईल, अशी आम्हाला आशा आहे, असं IMAच्या स्टेट ब्रँचने म्हटलं आहे.

रामदेव बाबा काय म्हणाले?

दरम्यान, रामदेव बाबा यांचा योगा करतानाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात त्यांनी डॉक्टरांची खिल्ली उडवली आहे. ‘तिसरा व्यक्ती म्हणाला, मला डॉक्टर व्हायचं आहे. टर… टर…टर…टर…टर…टर… टर बनयाचे आहे…डॉक्टर… एक हजार डॉक्टर तर आताच कोरोनाचे दोन डोस घेतल्यानंतर दगावले…. किती?…एक हजार… कालचीच बातमी आहे…स्वत:ला वाचवू शकत नाही, ती कसली डॉक्टरी?, अशा शब्दात रामदेव बाबा डॉक्टरांची खिल्ली उडवताना दिसत आहेत. डॉक्टर व्हायचेच असेल तर स्वामी रामदेव सारखं व्हा. माझ्याकडे कोणतीही डिग्री नाही. तरीही मी सर्वच विषयांचा डॉक्टर आहे. विदाऊट एनी डिग्री… विथ डिव्हिनिटी… विथ डिग्निटी आय अॅम ए डॉक्टर’, असंही ते या व्हिडीओत पुढे म्हणतात.

अॅलिओपॅथीवर काय म्हणाले?

यापूर्वी रामदेवबाबाने व्हॉटसअॅपवर एक मेसेज करून अॅलोपॅथीवर टीका केली होती. आश्चर्यकारक तमाशा आहे. अॅलोपॅथी मूर्खपणाचं आणि दिवाळखोर विज्ञान आहे. आधी रेमडेसिवीर फेल ठरलं, नंतर अँटिबायोटिक्स फेल झालं, नंतर स्टेरॉईड फेल झाले, प्लाझ्मा थेरपीवरही बंदी घालण्यात आली, असं ते म्हणाले होते. तापावर दिलं जाणारं फॅबीफ्ल्यू देखील निकामी ठरलंय. जेवढे औषधं देत आहेत त्या सर्वांचं हेच होत आहे. त्यामुळे हा काय तमाशा सुरू आहे, असं जनता म्हणत आहे. त्यांची तापावरील कोणतीही औषधं काम करत नाहीये. कारण ते शरीराचं तापमान कमी करत आहेत. मात्र, ज्या विषाणूमुळे, बुरशीमुळे ताप येत आहे त्याचा यांच्याकडे इलाज नाही. तर मग हे कसे बरे करणार?, असा सवालही त्यांनी केला होता. (IMA writes to Uttarakhand CM, seeks action against Baba Ramdev)

संबंधित बातम्या:

VIDEO: कोरोनाचा दुसरा डोस घेऊनही एक हजार डॉक्टर दगावले, हे कसले डॉक्टर?; रामदेव बाबांनी पुन्हा डिवचले

रामदेव बाबांकडून अखेर ‘ते’ वक्तव्य मागे, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस!

रामदेव बाबांचा पुन्हा एकदा एलोपॅथीवर निशाणा, IMA आणि फार्मा कंपन्यांना योगगुरुंचे 25 प्रश्न

(IMA writes to Uttarakhand CM, seeks action against Baba Ramdev)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.