Weather Forecast: आयएमडीकडून ऑगस्ट सप्टेंबरसाठी हवामानाचा अंदाज जारी, महाराष्ट्रात पावसाची स्थिती कशी राहणार?
भारतीय हवामान विभागाकडून यंदा प्रथमच पावसाळ्यात प्रत्येक महिन्यात हवामानाचा अंदाज जारी करण्यात येत आहे. हवामान विभागाचे मुख्य अधिकारी डॉ.महापात्रा यांनी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यासाठीचा हवामानाचा अंदाज जारी केला.
नवी दिल्ली: भारतीय हवामान विभागाकडून यंदा प्रथमच पावसाळ्यात प्रत्येक महिन्यात हवामानाचा अंदाज जारी करण्यात येत आहे. हवामान विभागाचे मुख्य अधिकारी डॉ.महापात्रा यांनी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यासाठीचा हवामानाचा अंदाज जारी केला. पावसाळ्याच्या या कालावधीमध्ये मान्सूनचा पाऊस सरासरी इतका राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात देखील ऑगस्ट महिन्यात सरासरी इतका पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सन 2021 च्या मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात संपूर्ण देशात पाऊस सरासरी इतका कायम राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. देशभरात या काळात सरासरीच्या 95 ते 105 टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महन्यात देशात सर्वत्र पाऊस पडेल असाही अंदाज आयएमडीच्या वतीनं वर्तवण्यात आला आहे.
ऑगस्ट महिन्यात पावसाची स्थिती काय?
भारतीय हवामान विभागानं संपूर्ण देशभरात ऑगस्ट महिन्यात पावसाचं प्रमाण सरासरी राहील, असं म्हटलं आहे. सरासरीच्या 94 ते 106 टक्के पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आयएमडीकडून ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सप्टेंबर महिन्यासाठीचा स्वतंत्र अहवाल जारी केला जाईल, असं सांगण्यात आलं आहे.
2 August 2021, डॉ महापात्र, डीजी आईएमडी ने मीडिया और अन्य हितधारकों को देश में अगस्त और सितंबर के लिए मॉनसून सीजन के दूसरे भाग में होने की संभावना के बारे में जानकारी दी. pic.twitter.com/EVAgOBukoj
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 2, 2021
ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात पावसाचा अंदाज काय?
भारतीय हवामान विभागनं जारी केलेल्या अंदाजानुसार मध्य भारत आणि दख्खनच्या पठारावर सरासरीच्या सामान्य पाऊस होऊ शकतो. यानुसार महाराष्ट्रात देखील ऑगस्ट महिन्यात सरासरी इतका पाऊस होऊ शकतो. सप्टेंबर महिन्यातही महाराष्ट्रात सरासरीच्या सामान्य स्थिती इतका पाऊस होणार आहे.
कोयना धरणातून विसर्ग कमी
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयना धरणातून नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाल्याने विसर्ग 50 हजाराहून 10 हजार क्युसेक इतका करण्यात येत आहेत. धरणात 13993 कयुसेक पाणी आवक सुरु आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊसाचा जोर कमी जोर असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. कोयना धरणाचे सहा दरवाजे 10 फुटावरुन 01.6 वर आणण्यात आले आहेत. कोयना धरणात 84.77tmc इतका पाणीसाठा झाला आहे.
इतर बातम्या:
राज्यात निर्बंध हटवण्याचे चिन्ह नाही, निर्बंधांसंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील : Rajesh Tope
IMD issue probable weather forecast for August and September monsoon rainfall in whole country likely to normal