‘पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती शासन लावा, लष्कराच्या तालमीत घ्या निवडणुका…’ मिथुन चक्रवर्ती ममता दीदींविरोधात अगोदरच मैदानात
West Bengal Assembly Election : भाजपा नेते आणि लोकप्रिय अभिनेते मिथुन चक्रवर्ती हे ममता दीदीविरोधात आक्रमक झाले आहेत. विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहे. केरळ, पश्चिम बंगाल हे भाजपाच्या हिटलिस्टवर आहेत.

भाजपा नेते आणि लोकप्रिय अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात बिगुल वाजवला आहे. दक्षिणेतील राज्य, पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच पश्चिम बंगालमधील काही घटनांमुळे भाजपा आक्रमक झाली आहे. तुष्टीकरणाच्या राजकारण सुरू असल्याने पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी त्यांनी केली. तर विधानसभा निवडणुका या लष्कराच्या देखरेखीत घेण्याची मोठी मागणी मिथुनदांनी केली आहे.
मुर्शिदाबाद हिंसेने व्यथित
आम्हाला राज्यात दंगे नकोत. सध्या पश्चिम बंगालमध्ये अत्यंत शोचनीय आणि दुखद घटना घडत आहेत. दंगलग्रस्त भागातून हिंदूवर घर सोडण्याची वेळ आली आहे. बंगालमध्ये सध्या तुष्टीकरणाचे राजकारण सुरू आहे. बंगालची कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. मुर्शिदाबाद हिंसेनंतर पश्चिम बंगालमधील वातावरण तापले आहे. मिथुन चक्रवर्ती यांनी या हिंसेवर मोठे वक्तव्य केले आहे. या हिंसेने आपण व्यथित झाल्याचे ते म्हणाले. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी केली. बंगालमध्ये पुढील निवडणूक ही लष्कराच्या देखरेखीखाली करण्याची मागणी त्यांनी केली.




भाजप-तृणमूल आमने-सामने
पश्चिम बंगालमध्ये 2026 मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी सातत्याने काही ना काही घटनांनी हे राज्य अशांत आहे. वक्फ कायद्याविरोधात राज्यात हिंसक आंदोलन झाले. मुर्शिदाबाद हिंसेनंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठी दोन्ही पक्ष मतदारांना आपल्याकडे ओढण्याची कसरत करत आहेत. राज्यात मुस्लिम लोकसंख्या पण मोठी आहे.
11 एप्रिल रोजी सर्वात अगोदर मुर्शिदाबाद येथील शमशेरगंज भागात हिंसाचार भडकला होता. सुरक्षा दलासोबतच दंगलखोर भिडले. त्यांनी अनेक भागात आगी लावल्या. जाळपोळ केली. त्यानंतर दंगलखोरांनी हिंदू कुटुंबाला लक्ष्य केले. पित्रा-पुत्राची त्यांच्या घरात जाऊन हत्या केली. दंगलखोरांनी पोलिसांची वाहनं जाळली.
दरम्यान राज्यपालांनी पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याने ममता बॅनर्जी सरकारवर कडक ताशेरे ओढले. हिंसाचार एखादा कॅन्सरसारखा राज्यात पसरल्याचा आरोप राज्यपालांनी केला. कोणताही सभ्य समाज अशी हिंसा सहन करू शकत नाही असे खडे बोल सुनावले.