AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supreme Court : तडीपारीचा आदेश एक असाधारण उपाय, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

कुठल्याही नागरिकाला तडीपार करणे हा एक विलक्षण उपाय आहे, यात कोणत्याही प्रकारची शंका असू शकत नाही. नागरिकांना भारताच्या संपूर्ण प्रदेशात मुक्तपणे फिरण्याचा मूलभूत अधिकार आहे. तडीपाराच्या आदेशाचा नागरिकांच्या या मूलभूत हक्कावर परिणाम होतो, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Supreme Court : तडीपारीचा आदेश एक असाधारण उपाय, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
सुप्रीम कोर्टात पोचले अनोखे प्रकरण
| Edited By: | Updated on: Jan 28, 2022 | 10:19 PM
Share

नवी दिल्ली : तडीपार करण्याचा आदेश हा एक ‘असाधारण उपाय’ आहे. याचा नागरिकांच्या मुक्त हालचालींच्या मूलभूत अधिकारावर परिणाम होतो. या आदेशामुळे नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्का(Fundamental rights)पासून वंचित राहावे लागते, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी सर्वोच्च न्यायालया(Supreme Court)ने नोंदवली आहे. डिसेंबर 2020 मध्ये महाराष्ट्रातील एका नागरिकाला जालना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. त्याबाबत तेथील जिल्हा प्रशासनाने दिलेला तडीपारीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गेल्या वर्षीच्या ऑगस्टच्या आदेशाला आव्हान देत जालना जिल्ह्यातील नागरिकाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. याचवेळी न्यायालयाने तडीपारीच्या आदेशासंबंधी महत्त्वपूर्ण मते नोंदवली आहेत.  (Important remarks of the Supreme Court regarding the order of Tadipar)

जालन्यातील नागरिकाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, अशा आदेशाचा व्यावहारिक दृष्टीने संयमाने अवलंब करणे आवश्यक आहे. तडीपारीच्या आदेशामुळे संबंधित नागरिकाला स्वतःच्या घरातही राहता येत नाही. या कालावधीत नागरिकाला त्याच्या उपजीविकेपासून वंचित राहावे लागते. हा केवळ तडीपारीच्या आदेशाचा परिणाम आहे, असे न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि न्यायमूर्ती अभय एस ओका यांच्या खंडपीठाने नमूद केले. मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तडीपारीच्या आदेशाविरोधात याचिका फेटाळल्यानंतर जालना जिल्ह्यातील नागरिकाने याला आव्हान देत दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

तडीपारीच्या आदेशाविरोधातील याचिका फेटाळली

याचिकाकर्त्याने याआधी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र उच्च न्यायालयाने त्याची तडीपारीच्या आदेशाविरोधातील याचिका फेटाळली होती. कुठल्याही नागरिकाला तडीपार करणे हा एक विलक्षण उपाय आहे, यात कोणत्याही प्रकारची शंका असू शकत नाही. नागरिकांना भारताच्या संपूर्ण प्रदेशात मुक्तपणे फिरण्याचा मूलभूत अधिकार आहे. तडीपाराच्या आदेशाचा नागरिकांच्या या मूलभूत हक्कावर परिणाम होतो, असे न्यायालयाने म्हटले आहे. जालना येथील रहिवासी असलेल्या व्यक्तीला दोन वर्षांच्या कालावधीसाठी पाच दिवसांत जिल्ह्याबाहेर जाण्याचा आदेश देण्यात आला होता. संबंधित नागरिकाने त्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयापर्यंत कायदेशीर लढा सुरू ठेवला. अखेर सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या तडीपारीचा आदेश रद्द करीत त्याला मोठा दिलासा दिला. (Important remarks of the Supreme Court regarding the order of Tadipar)

इतर बातम्या

Nashik Crime : इगतपुरी शहरात गॅंगवारचा भडका एकाची हत्या तर एक जण गंभीर जखमी, संचारबंदी लागू बाजारपेठा बंद

Kalyan : बांधकाम परवानगीमधील अनियमितता केडीएमसीच्या पाच माजी आयुक्तांसह 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.