Emergency landing: 24 तासांत दोन विमानं डायव्हर्ट, दुबईला जात असलेलं विमान मस्कतला, तर शारजावरुन येत असलेलं विमान कराचीत

कराचीत उतरवण्यात आलेल्या विमानाची तपासणी करण्यात येत असल्याचे इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. प्रवाशांना आणण्यासाठी दुसरे एयरक्राफ्ट कराचीत पाठवण्याची तयारीही सुरु करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. दुसरीकडे एयर इंडियाच्या मस्कतमध्ये उतरलेल्या प्रवाशांबाबत कोणतेही अपडेट जारी करण्यात आलेले नाहीत.

Emergency landing: 24 तासांत दोन विमानं डायव्हर्ट, दुबईला जात असलेलं विमान मस्कतला, तर शारजावरुन येत असलेलं विमान कराचीत
एकाच दिवसात दोन विमानांचे इमर्जन्सी लँडिंग Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 17, 2022 | 4:33 PM

नवी दिल्ली – रविवारी आकपाठोपाठ एक अशा दोन भारतीय एयरलाईन्स कंपन्यांना ( Indian Airlines), त्यांच्या आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स तांत्रिक बिघाडामुळे डायव्हर्ट कराव्या लागल्या. कालिकतवरुन दुबईला जात असलेलं एयर इंडिया एक्सप्रेसचं विमान मस्कतला (Muscat)उतरवण्यात आलं. त्याच्या काही तासांपूर्वी शारजावरुन हैदराबादला येत असलेलं इंडिगोचं विमान पाकिस्तानच्या कराचीत (Karachi) लँड करावं लागलं. डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार, एयर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात फॉरवर्ड गॅलरीत काहीतरी जळाल्याचा वास येत होता. त्यामुळं हे विमान मस्कतला डायव्हर्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर इंडिगोच्या विमानात क्रू मेंब्रस्नी तांत्रिक बिघाड झाल्याचे दर्शवून दिले, त्यानंतर विमान कराचीत नेण्यात आले. गेल्या दोन आठवड्यात कराचीत इमर्जन्सी लँडिंग करण्याची ही भारतीय एयरलाईनची दुसरी वेळ आहे. यापूर्वी स्पाईस जेटच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते विमानही कराचीत उतरवण्यात आले होते. कालिकटहून दुबईला जात असलेल्या एयर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाईट नंबर IX-355 बोईंग 737 प्लेनमार्फत ऑपरेट करण्यात येत होते. मस्कतमध्ये याचे लँडिंग शनिवारी मध्यरात्री करण्यात आले. इंडिगोचे शारजावरुन हैदराबादला येत असलेले फ्लाईट नंबर 6E-1406ला एयरबस A-320 मार्फत ऑपरेट करण्यात येत होते. कराचीत याचे लँडिंग शनिवारी मध्यरात्रीनंतर करण्यात आले.

प्रवाशांना आणण्यासाठी दुसरे विमान पाठवणार

कराचीत उतरवण्यात आलेल्या विमानाची तपासणी करण्यात येत असल्याचे इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. प्रवाशांना आणण्यासाठी दुसरे एयरक्राफ्ट कराचीत पाठवण्याची तयारीही सुरु करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. दुसरीकडे एयर इंडियाच्या मस्कतमध्ये उतरलेल्या प्रवाशांबाबत कोणतेही अपडेट जारी करण्यात आलेले नाहीत.

14 जुलैलाही इंडिगोच्या दोन विमानांचे इमर्जन्सी लँडिंग

गेल्या गुरुवारी दिल्लीतून बडोद्याला जात असलेल्या इंडिगोच्या विमानाचे जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगत हे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होत. तर दिल्लीहून मणिपूरचा लाचलेल्या इंडिगोच्या विमानाचे खराब हवामानामुळे कोलकाता विमानतळावर लँडिंग करावे लागले होते. या विमानात 141 प्रवासी होते.

हे सुद्धा वाचा

5 जुलैला एका दिवसात स्पाईस जेटचे दोन अपघात टळले

गेल्या मंगळवारी स्पाईसजेटच्या विमानांचे एकामागोमाग एक दोन अपघात होता होता वाचले. दिल्लीहून दुबईला जात असलेल्या विमानाचे कराचीत लँडिंग करावे लागले. हा प्रकार सकाळी घडला. फ्युईल लीक होत असल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला असे सांगण्यात आले. तर दुसरे प्रकरण कांडला ते मुंबई विमानात घडले. 23 हजार फूट उंचीवर गेल्यावर स्पाईसजेटच्या विमानाच्या विंडशील्ड आउटर पेनमध्ये बिघाड झाला. त्यानंतर विमान मुंबईत सुरक्षित उतरवण्यात आले.

Non Stop LIVE Update
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.