Ayodhya Ram Mandir | अयोध्येत पंतप्रधान मोदी ज्या घरी चहा प्याले, त्यांना पत्रासोबत गिफ्टमध्ये काय पाठवलं?
Ayodhya Ram Mandir | पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबरला अयोध्या दौऱ्यावर होते. त्यावेळी पंतप्रधान मोदी अचानक उज्जवला योजनेची 10 कोटीवी लाभार्थी मीरा मांझी यांच्या घरी गेले. त्यांच्या कुटुंबासोबत चर्चा केली व चहा प्याले होते.
अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबरला अयोध्या दौऱ्यावर गेले होते. त्यांनी अयोध्येतील विमानतळ आणि रेल्वे स्टेशनच उद्घाटन केलं होतं. पंतप्रधान मोदी त्यावेळी अचानक उज्जवला योजनेची 10 कोटीवी लाभार्थी मीरा मांझी यांच्या घरी गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी मीरा मांझी आणि सूरज मांझी यांच्यासोबत चहा प्याले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीरा मांझीला पत्र लिहून नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. चहासाठी त्या कुटुंबाचे आभार मानले. “उज्जवला योजनेचे तुम्ही 10 कोटीवी लाभार्थी आहात, हा फक्त एक आकडा नाहीय, याकडे कोट्यवधी देशवासियांची स्वप्न, संकल्प पूर्ण होण्याच्या दृष्टीने मी पाहतो” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या पत्रात दिलं आहे.
मोदींनी पत्रात काय लिहिलय?
“तुम्हाला व तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना वर्ष 2024 साठी शुभेच्छा. अयोध्येत आल्यानंतर मी अनेक वाहिन्यांवर तुमची मुलाखत पाहिली. तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आत्मविश्वास पाहून मला चांगलं वाटलं” असं मोदींनी पत्रात लिहिलय.
पंतप्रधान मोदींनी गिफ्टमध्ये काय दिलं?
“तुमच्यासारखे कोट्यवधी लोक माझं कुटुंब आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हेच माझं भांडवल आहे. समाधान आहे, जे मला देशासाठी मनापासून कार्य करण्यासाठी ऊर्जा देतं. मला विश्वास आहे, अमृतकाळात तुमच्यासारख्या कोट्यवधी देशवासियांचा उत्साह एक भव्य, विकसित भारत निर्माण करण्याच आमच लक्ष्य साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या पत्रात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या जोडप्याला पत्रासोबत गिफ्ट पाठवले आहेत. यात टी सेट, ड्रॉइंग बुक आणि कलर सेट आहे.