Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Boycott Maldives | त्यावेळी थेंब-थेंब पाण्यासाठी तरसलेला मालदीव, असे कसे भारताचे सगळे उपकार विसरला?

Boycott Maldives | भारत एकदा नाही अनेकदा संकटकाळात मालदीवच्या पाठिशी भक्कमपणे उभा राहिलाय. पण आज मालदीव हे सगळ विसरुन चीनच्या मागे पळतोय. मालदीवला येणाऱ्या दिवसात मोठा फटका बसू शकतो. कारण मालदीवला भारताची नाराजी परवडणारी नाही. ऑपरेशन नीर, ऑपरेशन संजीवनी मालदीव आज सगळच विसरलाय.

Boycott Maldives | त्यावेळी थेंब-थेंब पाण्यासाठी तरसलेला मालदीव, असे कसे भारताचे सगळे उपकार विसरला?
operation neer
Follow us
| Updated on: Jan 08, 2024 | 2:01 PM

Boycott Maldives | आधी मालदीवमधून भारतीय सैन्य हटवण्याचा मुद्दा त्यानंतर पंतप्रधान मोदींबद्दल तिथल्या मंत्र्यांच वादग्रस्त वक्तव्य. भारत आणि मालदीवमधील संबंध बिघडत चालले आहेत. राष्ट्रपति मोहम्मद मोइज्जू हे दोन्ही देशांमधील संबंध बिघडण्याच कारण आहे. त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत इंडिया आऊट हा भारतविरोधी नारा दिला होता. चीनच्या बाजूला मोहम्मद मोइज्जू यांचा जास्त कल आहे. पण मालदीववर जेव्हा-जेव्हा संकट आलं, तेव्हा-तेव्हा भारताच पाठिशी उभा राहिला होता. वर्ष 2014 मधील ‘ऑपरेशन नीर’ त्याच एक उत्तम उदहारण आहे. 2014 मध्ये मालदीवमध्ये पाणी संकट निर्माण झालं होतं. त्यावेळी मालदीवला भारताकडे मदत मागावी लागली. भारत सरकारने मालदीवला त्या संकटातून बाहेर काढलं होतं. जाणून घ्या काय होतं हे ऑपरेशन नीर आणि भारताने केव्हा-केव्हा मालदीवची मदत केलीय?

मालदीवची राजधानी मालेमध्ये आरओ प्लांट खराब झाल्याने पाणी संकट निर्माण झालं होतं. संपूर्ण शहर पाण्याच्या एक थेंबासाठी तरसत होतं. त्यावेळी मालदीवने भारत सरकारकडे मदत मागितली. सुषमा स्वराज त्यावेळी भारताच्या परराष्ट्र मंत्री होत्या. परराष्ट्र सचिव जयशंकर होते. सुषमा स्वराज गरजवंतांना तात्काळ मदत करायच्या. मालदीवच्या विषयातही त्यांनी तात्काळ मदत पाठवण्याच आश्वासन दिलं होतं. त्या पीएम मोदींशी बोलल्या व लगेच मदत पाठवण्याचा निर्णय झाला.

इंडियन एअरफोर्सने काय केलं?

इंडियन एअरफोर्सच्या ऑफिशियल वेबसाइटनुसार, माले शहराला रोज 100 टी पिण्याच्या पाण्याची आवश्यकता होती. इंडियन एअर फोर्सवर मदत पोहोचवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. भारतीय हवाई दलाच्या तीन तीन सी-17 आणि तीन आय एल-76 विमानांची तैनाती करण्यात आली. पॅक केलेल पाणी दिल्लीच्या अराक्कोणम येथून मालेला पाठवण्यात आलं. एअरफोर्सच्या विमानांनी 5 ते 7 सप्टेंबर दरम्यान 374 टन पिण्याच पाणी तिथे पोहोचवलं. ऑपरेशन संजीवनी

फक्त ऑपरेशन नीरच नाही भारताने अनेक प्रसंगात मालदीवची मदत केलीय. कोविड दरम्यान भारताने ऑपरेशन संजीवनी मोहिम चालवली. मालदीव सरकारच्या विनंतीवरुन भारताने C-130J विमानातून औषध आणि उपचार सामुग्री तिथे पोहोचवली. इतकच नाही, भारतीय सैन्याने वायरल टेस्ट लॅब बनवण्यासाठी 14 सदस्यीय मेडिकल पथक मालदीवला पाठवलं. भारत सरकारने 5.5 टन आवश्यक औषध मालदीवला दिली.

शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?
शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?.
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू.
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर.
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले.
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?.
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?.
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं.
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे.
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान.
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले...
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले....