Delhi Crime : आधी चिमुरडीवर बलात्कार केला, मग पट्ट्याने मारहाण, दिल्लीतील धक्कादायक घटना

आरोपीने मुलीला बंधक बनवत तिच्याशी जबरदस्ती करु लागला. यामुळे मुलगी जोरजोरात ओरडायला लागली. म्हणून आरोपीने पट्ट्याने तिला मारहाण केली. नंतर तिच्या तोंडात कपड्याचा बोळा कोंबत तिच्यावर बलात्कार केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. बलात्कार केल्यानंतर मुलीचे हात-पाय बांधून तिला खोलीत कोंडून पळून गेला.

Delhi Crime : आधी चिमुरडीवर बलात्कार केला, मग पट्ट्याने मारहाण, दिल्लीतील धक्कादायक घटना
प्रेमप्रकरणातील मारहाणीत तरुणाचा मृत्यूImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 6:32 PM

नवी दिल्ली : शेजाऱ्यानेच 13 वर्षाच्या मुलीला बंधक बनवून तिच्यावर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना दिल्लीतील नजफगढ परिसरात उघडकीस आली आहे. इतकेच नाही यावेळी मुलीने आरडाओरडा केल्याने नराधमाने तिला पट्ट्याने मारहाण (Beating)ही केली. याप्रकरणी नजफगढ पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करीत पुढील तपास सुरु केला आहे. घटना उघडकीस आल्यानंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. (In Delhi, a minor girl was tortured by a neighbour)

बलात्कार केल्यानंतर मुलीला बांधून ठेवले

न्यूज 18 ने दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी आपल्या कुटुंबासोबत नजफगढमधील जय विहारमध्ये राहते. सोमवारी मुलगी आईला शोधण्यासाठी शेजाऱ्याच्या घरी गेली होती. तिथे आरोपीही उपस्थित होता. आरोपीने मुलीला बंधक बनवत तिच्याशी जबरदस्ती करु लागला. यामुळे मुलगी जोरजोरात ओरडायला लागली. म्हणून आरोपीने पट्ट्याने तिला मारहाण केली. नंतर तिच्या तोंडात कपड्याचा बोळा कोंबत तिच्यावर बलात्कार केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. बलात्कार केल्यानंतर मुलीचे हात-पाय बांधून तिला खोलीत कोंडून पळून गेला. मुलीचा रडण्याचा आवाज ऐकून आई त्या खोलीत धावत गेली असता मुलीची अवस्था पाहून ती हैराण झाली. तिने मुलीची सुटका करत नजफगढ पोलिस गाठले आणि पोलिसात तक्रार दाखल केली.

येवल्यात भोंदूबाबाचा आईसह तिन्ही मुलींवर बलात्कार

मुलीचं लग्न जमत नसल्याने येवला तालुक्यातील नागडे गावातील एका बाबाकडे गेली असता बाबाने मुलीला जादूटोणा झाला आहे असं सांगत आईसह तिन्ही मुलींवर चाकूचा धाक दाखवत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली आहे. भोंदूबाबा व त्याचा सहकारी वकील या दोघांनी तब्बल दोन वर्षे 4 महिने वेळोवेळी आई व त्याच्या तिन्ही मुलींवर बलात्कार करून ब्लॅकमेल करत 8 लाख रुपयेही उकळले. तसेच एका मुलीस हिंदू धर्माबद्दल द्वेष निर्माण करून मुस्लिम बनण्यास प्रवृत्त केले. या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला असून यात भोंदूबाबा व त्याचा सहकारी वकील या दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. (In Delhi, a minor girl was tortured by a neighbour)

इतर बातम्या

Ratnagiri Accident : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात भीषण अपघात, एक महिन्याच्या बाळासह महिलेचा मृत्यू

Buldhana | समृद्धीच्या कंत्राटदाराला 21 कोटी 64 लाख रुपयांचा दंड, तहसीलदारांनी दिलेल्या आदेशात दिलंय नेमकं कारण

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.