Akhilesh Yadav: हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाखाली दगड ठेवला अन् लाल झेंडा रोवला की मंदिर तयार होते; अखिलेश यादव यांचं विधान

Akhilesh Yadav: आपल्या हिंदू धर्मात कुठेही पिंपळाच्या झाडाखाली एखादा दगड ठेवला आणि झेंडा रोवला की मंदिर तयार होते. लोक तिथे लगेच पूजा करू लागतात, असं अखिलेश यादव म्हणाले.

Akhilesh Yadav: हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाखाली दगड ठेवला अन् लाल झेंडा रोवला की मंदिर तयार होते; अखिलेश यादव यांचं विधान
हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाखाली दगड ठेवला अन् लाल झेंडा रोवला की मंदिर तयार होते; अखिलेश यादव यांचं विधानImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 2:32 PM

अयोध्या: देशात ज्ञानवापी मशीद आणि ईदगाहवरून वाद सुरू असतानाच समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव ((Akhilesh Yadav)) यांनी एक विधान केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आपल्या हिंदू धर्मात (hindu) कुठेही एखादा दगड ठेवला, त्याच्याजवळ एक लाल झेंडा फडकवला तर मंदिर तयार होतं. पिंपळाच्या झाडाखाली तर असे मंदिर हमखास तयार होतात, असं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे. टीव्ही 9 भारत वर्षला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं आहे. त्यांना ज्ञानवापी मशिदाच सर्व्हे ((Gyanvapi Masjid), वजूखान्याजवळील कथित शिवलिंगाच्या मुद्द्यावर सवाल करण्यात आला होता. त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं. भाजप सरकारला महागाई, बेरोजगारी आणि लोकांच्या रोजीरोटीची काहीच चिंता उरली नाही. ते द्वेष आणि वैमनस्याचं राजकारण करत आहेत. मूळ मुद्द्यांवरून लोकांचं लक्ष विचलीत करण्यासाठीचं भाजपचं हे षडयंत्र आहे, असा घणाघाती हल्लाही त्यांनी चढवला.

हे सुद्धा वाचा

आपल्या हिंदू धर्मात कुठेही पिंपळाच्या झाडाखाली एखादा दगड ठेवला आणि झेंडा रोवला की मंदिर तयार होते. लोक तिथे लगेच पूजा करू लागतात, असं अखिलेश यादव म्हणाले. भाजप या प्रकरणाला हवा देण्याचं काम करत आहे. तुमच्या सर्वांचं लक्ष महागाई आणि बेरोजगारीवरून विचलीत केलं जावं हा त्यामागचा हेतू आहे. ज्ञानवापीचं प्रकरण कोर्टात आहे आणि कोर्ट त्यावर निर्णय देईल, असं अखिलेश यादव यांनी सांगितलं. अयोध्येतही मूर्ती ठेवण्यात आली होती. भाजप जाणूनबुजून वातावरण खराब करत आहे. मूळ मुद्द्यावरून लोकांचं लक्ष विचलीत करून धर्माच्या मुद्द्यामध्ये लोकांना खिळवून ठेवण्याचं काम केलं जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

प्रत्येक गोष्ट महागलीय

भाजपला जनतेचे प्रश्न ऐकायचे नाहीयेत. आता सभागृहाचे कामकाज केवळ नऊ दिवस चालवणार आहेत असं ऐकलं आहे. राज्याचं बजेट सहा लाख कोटीचं आहे. उत्तर प्रदेशातील जनतेच्या प्रश्नांना अवघ्या नऊ दिवसात कसं उत्तर मिळेल. सभागृहाच्या कामकाजाचा कालावधी वाढवण्याची आम्ही मागणी करणार आहोत, असं ते म्हणाले. देशात पेट्रोल डिझेलसह सर्व अत्यावश्यक गोष्टींचे भाव गगनाला भिडले आहेत. सरकारने आता गरीबांना ओळख दाखवणंही बंद केलं आहे. ज्या गरीबांना आधी रेशन दिलं आता त्यांच्याकडून वसुली केली जात आहे. स्टील महागलं आहे. कोळसा महागला आहे. योगी सरकार येताच वीज कापली जात आहे. लोकांना नोटिसा दिल्या जात आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

उद्योगपतींना सर्व काही विकलं जात आहे

देशात उद्योगपतींना मोठ मोठ्या गोष्टी विकल्या जात आहेत. कंपन्या विकल्या जात आहेत. एलआयसी विकली जाणार आहे. एअरपोर्ट विकले जात आहेत. ट्रेन विकली जात आहे. उद्योगपतींना हवं ते खरेदी करण्याचा मार्ग मोकळा केला जात आहे. इंग्रजांनी फोडा आणि राज्य कराची निती अवलंबली होती. भाजप सरकारने त्याच पावलावर पाऊल ठेवलं आहे. हा सिद्धांत हजारो वर्, जुना आहे. इंग्रज हे त्याचे जन्मदाते. तोच सिद्धांत भाजप देशवासियांबाबत वापरत आहे. भाजपच्या काळात जेवढा अत्याचार झाला, तेवढा कोणत्याच सरकारच्या काळात झाला नव्हता, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.