प्रेमाचा नाही नेम, 20 दिवसांत तब्बल 8 जणांचा झाला गेम! Rajasthan मधील 8 हत्याकांडाची Murder Mystery

केवळ जयपूरमध्ये गेल्या दोन ते तीन आठवड्यात हत्येच्या आठ गंभीर घटना घडल्या आहेत. विविध घटनेत अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या आठ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या सर्व घटनांमध्ये पीडितांच्या जवळच्या नात्यांनीच त्यांचा खून केला आहे.

प्रेमाचा नाही नेम, 20 दिवसांत तब्बल 8 जणांचा झाला गेम! Rajasthan मधील 8 हत्याकांडाची Murder Mystery
पालघरमध्ये जमिन आणि पैशाच्या वादातून इसमाची हत्याImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 27, 2022 | 8:00 PM

जयपूर : राजस्थानमध्ये गुन्हेगारी कमी होण्याचे नावच घेत नाही. जवळपास दररोज हत्येच्या घटना उघडकीस येत आहेत. केवळ जयपूरमध्ये गेल्या दोन ते तीन आठवड्यात हत्येच्या आठ गंभीर घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे यातील बहुतांश हत्या (Murder) अनैतिक संबंधा (Immoral Relationship)तून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. विविध घटनेत अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या आठ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या सर्व घटनांमध्ये पीडितांच्या जवळच्या नात्यांनीच त्यांचा खून केला आहे. (In Jaipur, 8 people were killed in 20 days due to immoral relationship)

अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची हत्या

पहिली घटना जयपूरमध्ये 4 मार्च रोजी घडली आहे. जयपूरच्या घाटगेट स्मशानभूमीत अमृतपुरी कॉलनीत अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराची मदतीने दगडाने डोके ठेचून हत्या केली. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल कॉल डिटेल्सवरुन पोलिसांनी पत्नी आणि इतर आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर जयपूरच्या कालवाड परिसरात 14 मार्च रोजी बालाराम जाट या व्यक्तीची पैशांच्या वादातून सख्या भावांनी हत्या केल्याचे उघड झाले आहे. पैशांच्या व्यवहाराबाबात बोलण्यासाठी आरोपींनी भावाला घरी बोलावले. नंतर कपड्याने गळा आवळून त्यांची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी भावांना अटक केली आहे.

पुतण्याने काकाला चाकूने भोसकले

आपल्या पत्नीसोबत छेडछाड करीत असल्याच्या संशयातून जयपूरमधील सुभाष चौक परिसरात पुतण्याने काका भोसकल्याची घटना 13 मार्च रोजी घडली आहे. मोहम्मद कमरुद्दीन (70) असे हत्या करण्यात आलेल्या काकाचे नाव आहे तर रईस असे हत्या करणाऱ्या पुतण्याचे नाव आहे. रईसने मोहम्मदवर चाकूने 20 ते 25 वार केले, ज्यात त्यांचा मृत्यू झाला.

प्रियकराच्या मदतीने वहिनीकडून दिराची हत्या

आपल्या अनैतिक संबंधाची माहिती दिराला मिळाल्याने बदनामीच्या भितीने वहिनीने प्रियकराच्या मदतीने दिराची गळा चिरुन हत्या केल्याची घटना 11 मार्च रोजी शिप्रपथ परिसरात घडली. रंजन साहनी असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. हत्या केल्यानंतर आरोपींना कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मृतदेह टाकला. उषा आणि मोहसीन अशी आरोपींची नाव आहेत.

तर अनैतिक संबंधांच्या संशयातून शिवदासपुरा परिसरात एका कारखान्यातील लेबर सुपरवायजरची बेदम मारहाण करत हत्या करण्यात आल्याची घटना 19 मार्च रोजी घडली. याप्रकरणी कारखान्यातील तीन कामगारांना पोलिसांनी अटक केली आहे. हत्येतील मास्टर माईंड महेश कुमार याने मयत भैराराम देवासी याला आपल्या पत्नीसोबत बोलताना पाहिले होते. यामुळे महेशला भैरारामचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच संशयातून त्याने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने भैरारामची हत्या केली. (In Jaipur, 8 people were killed in 20 days due to immoral relationship)

इतर बातम्या

Noida Crime : नोएडामध्ये मूल चोरल्याच्या संशयावरून तरुणाची हत्या, मुख्य आरोपीला अटक

यवतमाळमध्ये जुना वाद उफाळून आला, आरोपींनी विष पाजून तरुणाचा काटा काढला! पाच आरोपी अटकेत

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.