मास्क नाही तर आता प्रवास नाही; DGCA दिले आदेश, मास्क न घातलेल्या प्रवाशांनी उड्डाणाच्या आधी खाली उतरावे लागणार
केवळ अपवादात्मक परिस्थितीतच मास्क काढण्याची मुभा असेल. तसेच उल्लंघन करणार्यांना प्रवाशांला उपद्रवी प्रवाशी मानले जाईल. तर त्याला 'नो फ्लाय लिस्ट'मध्येही टाकण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे.
नवी दिल्ली : देशात वाढत्या कोरोना (Corona) बाधीतांच्या संख्येंमुळे अनेक राज्यांनी नियम केले आहेत. तर सार्वजनिक ठिकाणी मास्कची सक्ती (masks mandatory) केली आहे. याच्याआधी रेल्वे प्रशासनाने प्रवासादरम्यान मास्कची सक्ती लागू केली होती. तशीच सक्ती आथा DGCA कडून लागू लकरण्यात आले आहे. यावेळी DGCA कडून सांगण्यात आले आहे की, दिल्ली हायकोर्टाच्या आदेशानुसार (Delhi HC order) , प्रवास करताना प्रवाशांना आता मास्क अनिवार्य करण्यात आले आहे. केवळ अपवादात्मक परिस्थितीतच मास्क काढण्याची मुभा असेल. तसेच उल्लंघन करणार्यांना प्रवाशांला उपद्रवी प्रवाशी मानले जाईल. तर त्याला ‘नो फ्लाय लिस्ट’मध्येही टाकण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे.
In line with Delhi HC order, aviation regulator DGCA issues new Covid norms for airports, aircraft making masks mandatory throughout the journey, and permits mask removal only under exceptional circumstances. Violators may be treated as ‘unruly passengers’.
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) June 8, 2022
प्रवाशांना आता मास्क अनिवार्य
विमान वाहतूक नियामक DGCA आज एक महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. त्यातंर्गत DGCA कडून सांगण्यात आले आहे की, दिल्ली हायकोर्टाच्या आदेशानुसार, प्रवास करताना प्रवाशांना आता मास्क अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच विमानतळ परिसर आणि विमान प्रवासात मास्क न घालणाऱ्यांविरोधात DGCAने आपली भूमिका कडक केली आहे. DGCAने म्हटले आहे की ज्या प्रवाशांनी मास्क घातलेले नाहीत त्यांना “अनियंत्रित” मानले जावे आणि निघताना फ्लाइटमधून खाली उतरावे. अलीकडच्या काळात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने हे निर्देश जारी करण्यात आल्याचेही हवाई वाहतूक नियामक DGCA यांनी सांगितले. तसेच DGCA यांनी सांगितले की, CISF कर्मचारी हे मास्क वापराचा नियम लागू करतील. त्यामुळे या नियमाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही प्रवाशाला विमानाच्या टेकऑफपूर्वी खाली उतरवले जाऊ शकते.
विशेषबाब म्हणजे हा आदेश अशा वेळी जारी करण्यात आला आहे जेव्हा, कोरोना बाबत नियमांचे पालन करण्यास नकार देणाऱ्या प्रवाशांविरोधात कठोर भूमिका घेण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. याआदेशानंतर DGCAची ही मार्गदर्शक तत्त्वे समोर आली आहेत.