MP Murder : जिने ममतेने भरवला घास, नराधमाने तिचाच केला घात; मध्य प्रदेशात पैशासाठी वृद्ध महिलेची हत्या

| Updated on: Feb 19, 2022 | 5:41 PM

महिलेच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर संतोष मिश्रा यांच्या मोबाईलवर फोन केला असता त्यांचे दोन्ही मोबाईलही बंद आढळले. यानंतर शेजाऱ्यांनी स्नेह नगर येथे राहणाऱ्या महिलेच्या भावाला फोन करुन सांगितले. ओमप्रकाश यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत घराचे बाहेरील कुलूप तोडून आत प्रवेश केला असता आतील दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला.

MP Murder : जिने ममतेने भरवला घास, नराधमाने तिचाच केला घात; मध्य प्रदेशात पैशासाठी वृद्ध महिलेची हत्या
कुर्ल्यात शॉपिंग सेंटरचा छज्जा कोसळून पाच वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू
Follow us on

मंदसौर : मध्य प्रदेशातील निवृत्त वृद्ध शिक्षिकेच्या हत्येचा उलगडा (Murder Solved) करण्यास पोलिसांना अखेर यश आले आहे. संतोष मिश्रा (65) असे हत्या करण्यात आलेल्या शिक्षिकेचे नाव आहे. लुटमारी (Loot)च्या उद्देशाने ओळखीतल्या तरुणाने ही हत्या घडवल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीने आधी महिलेची हत्या केली. त्यानंतर तिच्या घरातील ऐवज लुटून मृतदेह बाथरुममध्ये ठेवून आरोपी फरार झाला. हेमंत व्यास असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा मयत महिलेच्या विश्वासातील होता. तो नेहमी महिलेला मदत करीत असे. मयता त्याला रोज आईच्या मायेने खाऊ घालत असे. (In Madhya Pradesh, a young man murdered a retired teacher for money)

घरातून वास येऊ लागल्याने हत्येचा उलगडा

आज तकने दिलेल्या माहितीनुसार, मयत महिला संतोष मिश्रा अभिनंदन नगर मेनमध्ये एकटीच राहत होती. महिलेच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर संतोष मिश्रा यांच्या मोबाईलवर फोन केला असता त्यांचे दोन्ही मोबाईलही बंद आढळले. यानंतर शेजाऱ्यांनी स्नेह नगर येथे राहणाऱ्या महिलेच्या भावाला फोन करुन सांगितले. ओमप्रकाश यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत घराचे बाहेरील कुलूप तोडून आत प्रवेश केला असता आतील दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. संतोषचा मृतदेह बाथरूममध्ये पडला होता. यानंतर पोलिसांना फोन करून बोलावण्यात आले. महिला घरात एकटीच राहत असल्यामुळे हा अपघात असावा असे प्रथम दर्शनी पोलिसांना वाटले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला.

घराला लावलेल्या कुलूपावरुन हत्येचा संशय

घटना उघडकीस आली तेव्हा महिलेच्या घराला कुलूप होते. मात्र मयत महिला घराला कधीच कुलूप लावत नसे. महिला इंटरलॉक करत असे, अशी माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी हत्येच्या दिशेने या प्रकरणाचा तपास सुरु केला. यानंतर पोलिसांना आरोपी हेमंतचे महिलेकडे नियमित येणे-जाणे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता आपण हत्या केल्याचे त्याने कबुल केले. आरोपी हा परिसरातील टायर पंक्चर दुरुस्त करण्याचे काम करतो. तो महिलेचा विश्वासू माणूस होता. मात्र अय्याशी करण्याच्या सवयीमुळे त्याच्यावर कर्ज झाले होते. हे कर्ज फेडण्यासाठीच त्याने लुटमारीच्या उद्देशाने महिलेची हत्या केली.

अशी केली हत्या

आरोपी हेमंत हा महिलेची सर्व कामे करीत असे. त्याचे मियमित महिलेच्या घरी येणे-जाणे होते. हत्येच्या दिवशीही आरोपी अर्ज देण्याच्या बहाण्याने महिलेच्या घरी आला. त्यानंतर त्याने महिलेकडे जेवण मागितले. महिला त्याच्यासाठी जेवण आणण्यासाठी किचनमध्ये गेली असता तो ही महिलेच्या पाठी किचनमध्ये गेला. त्यानंतर त्याने किचनमधील एक जड वस्तू उचलली आणि महिलेच्या डोक्यात वार केला. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. महिलेची हत्या केल्यानंतर त्याने घरातील किंमती ऐवज लुटला. मग महिलेचा मृतदेह बाथरुममध्ये टाकून मुख्य दरवाजाला कुलूप लावून पळून गेला. (In Madhya Pradesh, a young man murdered a retired teacher for money)

इतर बातम्या

Dawood Ibrahim : अनेक राजकारणी आणि उद्योजक दाऊदच्या हिटलिस्टवर, मुंबई-दिल्लीसह बड्या शहरांमध्ये घातपात घडवण्याचा कट

Kalyan : रेल्वे प्रवाशांना दमदाटी करून लुबाडणारे तिघे गजाआड, सीसीटीव्हीच्या आधारे अटक, कल्याण रेल्वे पोलिसांची कारवाई