Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon : महाराष्ट्रावर नैर्ऋत्य वाऱ्याचीच कृपादृष्टी, 15 जुलैपर्यंत मान्सून होतो सक्रीय

शेती व्यवसायाच्या दृष्टीने मान्सूनचा पाऊसच सर्वाधिक महत्वाचा आहे. विशेषत: महाराष्ट्रात 85 टक्के पाऊस हा नैऋत्य मान्सून मुळे बरसतो. भौगोलिक स्थितीमुळे पावसाच्या प्रमाणात फरक असला तरी शेती व्यवसाय याच पावसावर अवलंबून आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या पावसावरच खरीप हंगामातील पिकांचे भवितव्य अवलंबून असते तर साठा झालेल्या पिकांवर रब्बी हंगामातील पिकांची उत्पादकता ठरली जाते.

Monsoon : महाराष्ट्रावर नैर्ऋत्य वाऱ्याचीच कृपादृष्टी, 15 जुलैपर्यंत मान्सून होतो सक्रीय
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 6:02 AM

मुंबई : भारत देशात दोन शाखांमधून (Monsoon) मान्सूनचे आगमन होत असले तरी महाराष्ट्रासाठी नैर्ऋत्य (Southwesterly winds) दिशेकडून वाहणारेच प्रभावी ठरते. नैर्ऋत्य मॉन्सून ऋतू म्हणजेच भारतीय पावसाळी ऋतू असे संबोधले जाते. मान्सूनची वेगवेगळी रुपे असली तरी एकट्या नैऋत्य मान्सून मुळे (Maharashtra) महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडतो. असे असले तरी राज्यातील पर्वतरांगांची स्थिती आणि भूमीमध्ये असलेला फरक या दोन घटकांचा भारतीय पर्जन्यमानावर वेगळा असा परिणाम आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या पश्चिमकडील किनारपट्टीवर, आसामच्या डोंगराळ प्रदेशावर व हिमालयाच्या पायथ्याच्या प्रदेशावर सर्वाधिक पाऊस पडतो. यंदा मान्सूनचे आगमन 3 दिवस आगोदर झाले असले तरी दरवर्षी 1 जून रोजीच केरळमधील तिरुअनंतपुरमला 1 जूनला मान्सूनचा पहिला पाऊस पडतो.

नैर्ऋत्य मॉन्सून वाऱ्याची अशी होते निर्मिती

उत्तर भारतातील भूमिपृष्ठावर कमी दाबाचा प्रदेश निर्माण होतो व त्याच्या सहवासात हिंदी महासागर, अरबी समुद्र व बंगालचा उपसागर यांवरील आर्द्रतेने भारावलेली हवा ओढली जाते. अरबी समुद्रावर व बंगालच्या उपसागरावर वाऱ्यांची दिशा ही नैर्ऋत्य असल्यामुळे जून ते सप्टेंबरच्या कालावधीला ‘नैर्ऋत्य मॉन्सून ऋतू’ असे म्हणतात. भारतीय द्वीपकल्पावरील वारे नैर्ऋत्येकडून येतात, पूर्वभागात ते दक्षिणेकडून व उत्तर भारतात ते पूर्वेकडून वाहतात. मॉन्सूनचे हे अभिलक्षण भारतातच प्रकर्षाने प्रत्ययास येते. जगात इतरत्र हा प्रकार क्वचितच आढळतो. देशातील पर्जन्यमानावर मान्सूचाच अधिकचा प्रभाव आहे.

महाराष्ट्रातील शेती मान्सूनवरच अवलंबून

शेती व्यवसायाच्या दृष्टीने मान्सूनचा पाऊसच सर्वाधिक महत्वाचा आहे. विशेषत: महाराष्ट्रात 85 टक्के पाऊस हा नैऋत्य मान्सून मुळे बरसतो. भौगोलिक स्थितीमुळे पावसाच्या प्रमाणात फरक असला तरी शेती व्यवसाय याच पावसावर अवलंबून आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या पावसावरच खरीप हंगामातील पिकांचे भवितव्य अवलंबून असते तर साठा झालेल्या पिकांवर रब्बी हंगामातील पिकांची उत्पादकता ठरली जाते.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रात नैर्ऋत्य मॉन्सून वाऱ्याची अशी आगेकूच

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात श्रीलंकेत मान्सूनचे आगमन झाल्यानंतर 1 जून रोजी हाच मान्सून देशात आणि महाराष्ट्रात केरळातून दाखल होतो. आठवड्याभरात कोलकत्ता आणि मुंबई उपनगरात मान्सूनच्या सरी बरसल्या जातात. यंदा मात्र, 29 मे रोजीच मान्सूनचे आगमन हे केरळात झाले असून 5 जूनपर्यंत तो महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज आहे. 15 जुलैपर्यंत मान्सून वारे पूर्ण भारतात वाहू लागतात. तर सप्टेंबरपासून परतीच्या पावसाला सुरवात होते. ऑक्टोंबर पर्यंत सर्व भागातून मान्सून हा परतलेला असतो.

'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या.
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया.
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका.
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता.
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?.
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक.
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय.
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी.