Bihar : पटनामध्ये मोबाईलवर बोलता बोलता मॅनहोलमध्ये पडली महिला, लोकांनी केवळ 18 सेकंदात वाचवले प्राण

एका हातात सामान घेऊन एक महिला मोबाईलवर बोलत रस्त्याने जात होती. यादरम्यान ओव्हरब्रिजजवळ मधल्या रस्त्यावर एक मॅनहोल उघडे होता. ती स्त्री मॅनहोलपुढे इकडे तिकडे पाहत चालली होती आणि अचानक चेंबरमध्ये पडली. महिला मॅनहोलमध्ये पडल्याचे पाहून घटनास्थळी उपस्थित लोकांनी गर्दी केली.

Bihar : पटनामध्ये मोबाईलवर बोलता बोलता मॅनहोलमध्ये पडली महिला, लोकांनी केवळ 18 सेकंदात वाचवले प्राण
पटनामध्ये मोबाईलवर बोलता बोलता मॅनहोलमध्ये पडली महिलाImage Credit source: Dainik Bhaskar
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 5:51 PM

पटना : फोनवर बोलण्याच्या नादात एक महिला (Women) मॅनहोल (Manhole) पडल्याची घटना पटनामध्ये घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सुदैवाने तेथे उपस्थित लोकांनी 18 सेकंदाच्या आत महिलेला बाहेर काढले आणि तिचा जीव वाचवला. रस्त्याच्या मधोमध मॅनहोलचे झाकण उघडले होते. एक रिक्षा त्यावर उभी होती. एक महिला त्या रिक्षाच्या मागे फोनवर बोलत चालत होती. रिक्षा जशी मॅनहोलवरुन पुढे गेली तशी महिला सरळ त्या मॅनहोलमध्ये पडली. पाटणा शहरातील वॉर्ड क्रमांक 56 मधील ही घटना आहे. ही महिला बाजारातून परतत असताना रस्त्याच्या मधोमध असलेल्या उघड्या मॅनहोलमध्ये पडली. (In Patna a woman fell into a manhole while talking on a mobile phone, people saved lives in just 18 seconds)

अशी घडली घटना

एका हातात सामान घेऊन एक महिला मोबाईलवर बोलत रस्त्याने जात होती. यादरम्यान ओव्हरब्रिजजवळ मधल्या रस्त्यावर एक मॅनहोल उघडे होता. ती स्त्री मॅनहोलपुढे इकडे तिकडे पाहत चालली होती आणि अचानक चेंबरमध्ये पडली. महिला मॅनहोलमध्ये पडल्याचे पाहून घटनास्थळी उपस्थित लोकांनी गर्दी केली. या घटनेमुळे महिलेला मानसिक धक्का बसला. तिला जवळच्या रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले. या घटनेनंतर प्रशासनाच्या हलगर्जीपणाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

पटनामध्ये मॅनहोल उघडे असणे सामान्य बाब

पटना बिहारची राजधानी आहे. मात्र राजधानीतही नागरी सुविधांची अनास्था दिसतेय. रस्त्यांवरील मॅनहोल्स उघडे ठेवणे ही पटनामध्ये सामान्य बाब आहे. मनपाचे कर्मचारी गंभीर होऊन उघड्या मॅनहोलबाबत गंभीर असते, तर अशी घटना घडली नसती. ही महिला 7 ते 8 फूट खोल नाल्यात पडली आणि सुदैवाने लोकांचे लक्ष तिच्याकडे गेले म्हणून तिचा जीव वाचला. (In Patna a woman fell into a manhole while talking on a mobile phone, people saved lives in just 18 seconds)

इतर बातम्या

Murder Mystery: जावेदसोबतच्या लग्नानंतही रुबिनाचे विवाहीत जितेंद्रशी संबंध! नवऱ्याला रुबिना म्हणाली, ‘जावेद माझा भाऊए!’

Narayan Rane : नारायण राणेंना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, दोन आठवडे अटक टळली

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....