Modi 3.0 Govt : 2014 मध्ये भूतान, 2019 मध्ये मालदीव आता तिसऱ्या टर्ममध्ये मोदींचा पहिला परदेश दौरा कुठल्या देशापासून?
Modi 3.0 Govt : नरेंद्र मोदी 2014 साली पहिल्यांदा पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांनी भूतानचा पहिला परदेश दौरा केला होता. त्यानंतर 2019 साली पुन्हा सत्तेवर आल्यानंतर त्यांनी मालदीवचा पहिला परदेश दौरा केला होता. आता तिसऱ्या कार्यकाळात मोदी कुठल्या देशापासून परदेश दौऱ्याची सुरुवात करणार जाणून घ्या.
मोदी सरकार 3.0 चा कार्यकाळ सुरु झालाय. मंत्र्यांना खाते वाटप जाहीर झालय. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदाचा कार्यभार संभाळलाय. पीएम मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातही परराष्ट्र धोरणावर विशेष फोकस असेल. याची झलक शपथ ग्रहण समारंभात पहायला मिळाली. मोदी सरकारच्या शपथविधीला 7 देशांचे अध्यक्ष उपस्थित होते. तिसऱ्या कार्यकाळात मोदी कुठल्या देशापासून परराष्ट्र दौऱ्याची सुरुवात करणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 साली पहिल्यांदा पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांनी भूतानचा पहिला परदेश दौरा केला होता. त्यानंतर 2019 साली पुन्हा सत्तेवर आल्यानंतर त्यांनी मालदीवचा पहिला परदेश दौरा केला होता. मोदींनी कार्यभार संभाळल्यानंतर शेजारी देशांना पहिलं प्राधान्य दिल्याच पहायला मिळालय.
यावेळी पीएम मोदी यांच्या परदेश दौऱ्याची सुरुवात इटलीपासून होऊ शकते. इटलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी G7 सम्मेलनात सहभागी होऊ शकतात. G7 संम्मेलन 13 ते 15 जून दरम्यान इटलीच्या बोर्गो एग्नाजिया (फसानो) मध्ये होणार आहे. पीएम मोदी 14 जूनला एक दिवसाच्या शिखर सम्मेलनाला उपस्थित राहतील, अशी शक्यता आहे. मार्च 2023 मध्ये इटलीच्या पंतप्रधान जियोर्जिया मेलोनी भारत दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी दोन्ही नेत्यांनी भारत-इटलीचे संबंध रणनितीक भागीदारीच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी पावलं उचलली.
भारत युक्रेन शांती शिखर संम्मेलनात सहभागी होणार का?
G7 शिखर समीट एक अनौपचारिक आंतरराष्ट्रीय मंच आहे. इटली, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, जापान, यूके आणि अमेरिका या समूहाचे सदस्य आहेत. इटलीला यावर्षी 1 जानेवारीला G7 च अध्यक्षपद मिळालं. G7 शिखर सम्मेलनानंतर स्विर्त्झलँडमध्ये युक्रेन शांती शिखर संम्मेलन होणार आहे. यात 90 देश म्हणजे अर्धा युरोप सहभागी होणार आहे. युक्रेनमध्ये शांतचा प्रस्थापित व्हावी, यासाठी उपाय शोधले जाणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या शिखर सम्मेलनात भारत सहभागी होणार नाही.