UP Murder : उत्तर प्रदेशात अवघ्या 500 रुपयांसाठी केली 13 वर्षीय मुलाची हत्या; मित्राने दिली गुन्ह्याची कबुली

बांदा शहरात मूळचंद्र कुशवाह यांनी चहाचा स्टॉल लावला आहे. मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांनी मुलगा संदीप कुशवाह (13) याला 500 रुपये देऊन दुकानातील सामान आणण्यासाठी नगरला पाठवले होते, मात्र तेथून संदीप परत आला नाही. रात्री उशिरापर्यंत त्याचा कोणताही सुगावा न लागल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली.

UP Murder : उत्तर प्रदेशात अवघ्या 500 रुपयांसाठी केली 13 वर्षीय मुलाची हत्या; मित्राने दिली गुन्ह्याची कबुली
बहिणीच्या लग्नाची धामधूम, भावाचा ह्र्दयविकाराने मृत्यूImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 2:14 AM

लखनौ : उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात वडिलांकडून 500 रुपये घेऊन वस्तू खरेदी करण्यासाठी गेलेल्या 13 वर्षीय मुलाची हत्या (Murder) करण्यात आली. नंतर त्या मुलाचा मृतदेह शहरातच पुलाखाली पाण्यात फेकण्यात आला. केवळ 500 रुपये हिसकावून घेण्यासाठी त्याची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी काही तासांतच मृताच्या मित्राला अटक (Arrest) केली. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी निष्काळजीपणा दाखविल्याचा आरोप मृत संदीपच्या पालकांनी केला आहे. त्यामुळे मुलाचे बेपत्ता होणे व नंतर त्याची हत्या होणे या सर्व प्रकारावरून मातौंध पोलिसही चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहेत. (In Uttar Pradesh, a 13-year-old boy was killed for only 500 rupees)

सुरुवातीला पोलिसांचा तपासात सुस्त कारभार

बांदा शहरात मूळचंद्र कुशवाह यांनी चहाचा स्टॉल लावला आहे. मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांनी मुलगा संदीप कुशवाह (13) याला 500 रुपये देऊन दुकानातील सामान आणण्यासाठी नगरला पाठवले होते, मात्र तेथून संदीप परत आला नाही. रात्री उशिरापर्यंत त्याचा कोणताही सुगावा न लागल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यावर पोलिसांनी त्या माहितीच्या आधारे गांभीर्याने तपास सुरु केला नव्हता. बुधवारी सकाळी संदीपचा मृतदेह जीआयसीजवळील पुलाखाली पाण्याने साचलेल्या खड्ड्यात आढळला.

कसून चौकशीदरम्यान आरोपीकडून हत्येच्या गुन्ह्याची कबुली

घटनेची खबर मिळताच पोलीस अधीक्षक अभिनंदन यांनीही घटनास्थळी पोहोचून चौकशी केली. त्यांनी शहरातील मिठाईच्या दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची बारकाईने झडती घेतली. त्यावरून संदीपने शहरातील इचोली चौकात असलेल्या दुकानात मोमोज खाल्ल्याचे उघड झाले. त्याआधारे पोलिसांनी मोमोज दुकानदाराचीही चौकशी केली. श्वान पथकही घटनास्थळी पोहोचले. एसओजीचे पथकही तपासात व्यस्त झाले होते. याचदरम्यान काही तासांतच एसओजी आणि मातौंध पोलिसांनी मृत संदीपचा मित्र 18 वर्षीय धीरू उर्फ ​​टोटू पुत्र कामटा याला अटक केली. त्याने पोलिसांच्या कसून चौकशीनंतर हत्येचा गुन्हा मान्य केला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक लक्ष्मी निवास मिश्रा यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.

पैशांच्या वादातून गळा आवळून खून

आरोपीने खुनाची कबुली देतानाच यामागील धक्कादायक कारणाचाही उलगडा केला. त्याने पैशाच्या वादातून गळा आवळून खून केल्याचे सांगितले. मृत संदीपच्या खिशातून काढलेले 500 रुपयेही आरोपीकडून जप्त करण्यात आले आहेत. एसओजीचे प्रभारी मयंक चंदेल यांच्या पोलिस पथकाने या गुन्ह्याची उकल केली. पोलिसांनी सहकार्य केले नाही, असा आरोप संदीपचे वडील मूलचंद्र आणि आई मिथलेश यांनी केला आहे. पोलिसांनी सहकार्य केले असते तर मुलाचे प्राण वाचले असते, असे त्यांनी म्हटले आहे. (In Uttar Pradesh, a 13-year-old boy was killed for only 500 rupees)

इतर बातम्या

NM Bike Theft : मोटार सायकल चोरी करणाऱ्या 2 आरोपींना पनवेल गुन्हे शाखेकडून अटक

Nashik Lightning : इगतपुरीत शेतकरी दाम्पत्याचा वीज कोसळून मृत्यू, चार जण गंभीर जखमी

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.