दिल्लीतील थिंकटँकनंतर आता आयटी विभागाचा एनजीओकडे मोर्चा, ग्लोबल एनजीओ ‘ऑक्सफॅम’ वर छापेमारी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने दुपारच्या सुमारास या संस्थांमध्ये छापा टाकला आणि फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन अॅक्ट (FCRA) च्या कथित उल्लंघनाच्या चौकशीचा एक भाग म्हणून खाते आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी केली.
नवी दिल्ली : आयकर विभागाने बुधवारी दिल्लीस्थित थिंक-टँक सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च (सीपीआर) नंतर ग्लोबल एनजीओ ऑक्सफॅम (Oxfam) इंडिया विरुद्ध मीडिया फाउंडेशनवर छापेमारी (Raid) केली. त्यांच्याकडून मिळालेल्या निधीतील कथित एफसीआरए उल्लंघनाच्या चौकशीचा भाग म्हणून हा तपास (Investigate) करण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. आयटीने गैर-सरकारी संस्था (एनजीओ) आणि धर्मादाय संस्था डोमेनमधील आणखी तीन संस्थांवर अचानक कारवाई केली.
आयकर विभागाकडून कर्मचारी, संचालक, पदाधिकाऱ्यांचीही चौकशी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने दुपारच्या सुमारास या संस्थांमध्ये छापा टाकला आणि फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन अॅक्ट (FCRA) च्या कथित उल्लंघनाच्या चौकशीचा एक भाग म्हणून खाते आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी केली. कार्यालयीन कर्मचारी आणि मुख्य संचालक आणि पदाधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात आल्याचे कळते.
कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या एनजीओंवर कारवाई
सूत्रांनी सांगितले की, आयकर विभाग FCRA द्वारे प्राप्त झालेल्या निधीच्या पावतीच्या तुलनेत या संस्थांचे ताळेबंद तपासत आहे. कायद्यानुसार, परदेशी निधी मिळवणाऱ्या सर्व एनजीओंची एफसीआरए अंतर्गत नोंदणी करावी लागते. सरकारने गेल्या पाच वर्षांत कायद्यातील विविध तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल सुमारे 1,900 एनजीओची एफसीआरए नोंदणी रद्द केली आहे. डिसेंबर अखेर 2021 पर्यंत 22,762 FCRA नोंदणीकृत संस्था होत्या.
सीपीआर आणि ऑक्सफॅमकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया नाही
आज सेंटर ऑफ पॉलिसी रिसर्चवरही आयकर विभागाने छापे टाकले. या संदर्भात सीपीआर आणि ऑक्सफॅमकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. आज सेंटर ऑफ पॉलिसी रिसर्चवरही आयकर विभागाने छापे टाकले. या संदर्भात सीपीआर आणि ऑक्सफॅमकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
भाजप सरकारचे प्रमुख टीकाकार आणि शिक्षणतज्ज्ञ प्रतापभानू मेहता हे देखील सेंटर ऑफ पॉलिसी रिसर्चचे प्रमुख राहिले आहेत. सध्या सीपीआरच्या प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षा मीनाक्षी गोपीनाथ आहेत. राजकीय वैज्ञानिक गोपीनाथ जवाहरलाल नेहरू विद्यापीठात प्राध्यापक आणि नवी दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेजच्या प्राचार्य होत्या. यामिनी अय्यर या अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी आहेत. बोर्डाच्या सदस्यांमध्ये माजी परराष्ट्र सचिव श्याम सरन आणि आयआयएमचे प्राध्यापक रामा विजापूरकर यांचा समावेश आहे.