BPO मध्ये 7 हजाराची नोकरी अन् 113 कोटींचा आयकर
BPO मध्ये 7 हजाराची नोकरी करणाऱ्या युवक अचानक चर्चेत आला आहे. कारण या युवकाने 132 कोटी रुपयांचे ट्रांजिक्शन केले होते. त्यासाठी 113 कोटी रुपये आयकर भरावा, अशी नोटीस त्या युवकाला आली आहे. त्याच्या सहकाऱ्यांनाही नोटीस आली आहे.
इंदूर : देशात आयकर भरणाऱ्यांची संख्या कमी कमी आहे. यामुळे जास्त आयकर कोणी भरले याची बातमी होते. त्याची चांगली चर्चाही होते. सध्या चर्चा आयकर विभागाची सुरु आहे. BPO मध्ये 7 हजाराची नोकरी करणाऱ्या व्यक्तीबदल बातमी आली आहे. या व्यक्तीने 132 कोटी रुपयांचे ट्रांजिक्शन केल्याचा दावा आयकर विभागाने केला आहे. मग त्याला 113 कोटी 83 लाख 32 हजार 8 रुपये आयकर जमा करण्यासाठी नोटीस पाठवली आहे. इतका आयकर असणार असल्यामुळे तो व्यक्ती चर्चेत आला आहे. त्याचे नाव रवी गुप्ता आहे.
काय आहे प्रकरण
रवी गुप्ताचे हे प्रकरण 2011-12 मध्ये 132 कोटी रुपयांच्या बँकिंग व्यवहाराशी संबंधित आहे.2011-12 मध्ये 132 कोटींच्या कथित व्यवहारावर कर भरण्याची नोटीस देण्यात आली आहे. आश्चर्याची म्हणजे रवी गुप्ता त्यावेळी इंदूरमधील एका बीपीओमध्ये काम करत होता. तेव्हा त्याचा पगार सात हजार रुपये होता. आता त्यांचा पगार दरमहा 58 हजार रुपये आहे. रवी गुप्ता याला यापूर्वी 2019 मध्ये 3.49 कोटी रुपयांचा कर भरण्याची नोटीस मिळाली होती.
काय म्हणतो रवी गुप्ता
या प्रकाराबाबत रवी गुप्ता यांनी सांगितले की, 2019 मध्ये त्याला आयकर विभागाकडून पहिली नोटीस मिळाली होती. त्यात साडेतीन कोटी रुपये जमा करण्याचे सांगितले होते. त्याच्या नावावर कोणीतरी बनावट कंपन्या तयार करून व्यवहार केले होते. त्याने यासंदर्भात महाराष्ट्र पोलिस आणि मध्य प्रदेश पोलिसांकडे फसवणुकीची लेखी तक्रार केली होती. आता पुन्हा 23 मार्च रोजी रवी गुप्ता याला आयकर विभागाकडून आणखी नोटीस आली. त्यात 113 कोटी 83 लाख 32 हजार 8 रुपये जमा करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली होती.
सीबीआय आणि ईडीकडे तक्रार
रवी गुप्ता याने या प्रकाराबात पंतप्रधान कार्यालयास 2020 मध्ये तक्रार केली होती. तसेच सीबीआय आणि ईडीकडे तक्रार केली. कारण या प्रकरणात आपणास मनी लाँड्रिंग झाल्याचे दिसते. परंतु तपास यंत्रणांनी आजपर्यंत याचा तपास का केला नाही?
सहकाऱ्यांनाही नोटीस
रवी गुप्ता यांच्यासोबत, त्याच बीपीओमध्ये काम करणाऱ्या इतर दोन सहकार्यांना देखील नोटीस आली. हे प्रकरण 2011-12 मध्ये व्यवहारांसाठी आहे. कपिल गुप्ता आणि प्रवीण राठोड यांच्या पॅनकार्डचा वापर करून शेकडो कोटींचे व्यवहार करण्यात आले आहेत.
हे ही वाचा
पुण्यातील IAS ने दोन भेटीनंतरच केले टीव्ही कलाकाराशी लग्न, वाचा त्यांची लव्ह स्टोरी
पुण्यातील राजकीय नेत्यांना धमकी देत खंडणी मागणाऱ्या आरोपीला बेड्या
पुणेकरांनो वाहतुकीचे नियम पाळा, पाहा वर्षभरात किती कोटींचा झाला दंड