Independence Day 2023 Slogans Quotes | स्वातंत्र्यदिनाच्या या 10 घोषणा वाचून तुमचं रक्त खवळेल! वाचा कुणी लिहिल्या?
'वंदे मातरम्', 'इंकलाब जिंदाबाद','सत्यमेव जयते', 'सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा'! आठवतंय? या घोषणा पहिल्यांदा कुणी दिल्या? त्या कुणी लिहिल्या? माहितेय? आज आम्ही तुम्हाला अशाच काही घोषणा सांगणार आहोत. या घोषणा कुणी लिहिल्या, कुणाच्या आहेत तेही तुम्ही वाचा. शुभेच्छा देताना या घोषणा देखील वापरा कारण या घोषणा आपला अभिमान आहेत.
मुंबई: आज 15 ऑगस्ट, स्वातंत्र्यदिन! देशभरात आज 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. आज देशभरात लोकांचा उत्साह बघण्यासारखा आहे, सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. प्रत्येकजण स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत आहे. ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स वर स्वातंत्र्यदिनाची शायरी, स्लोगन टाकले जातायत. मेसेज करताना सुद्धा लोक शुभेच्छा देताना एकदम हटके शुभेच्छा देत आहेत. आज तर गुगलवर सुद्धा देशभक्तीपर गीते, शायरी, कोट्स, घोषणा हे सगळं ट्रेंड होतंय. तुम्हाला आठवतं का लहानपणी शाळेत असताना आपण स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी खूप उत्सुक असायचो. तेव्हा आपण अनेक घोषणा द्यायचो. ‘वंदे मातरम्’, ‘इंकलाब जिंदाबाद’,’सत्यमेव जयते’, ‘सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा’! आठवतंय? या घोषणा पहिल्यांदा कुणी दिल्या? त्या कुणी लिहिल्या? माहितेय? आज आम्ही तुम्हाला अशाच काही घोषणा सांगणार आहोत. या घोषणा कुणी लिहिल्या, कुणाच्या आहेत तेही तुम्ही वाचा. शुभेच्छा देताना या घोषणा देखील वापरा कारण या घोषणा आपला अभिमान आहेत.
स्वातंत्र्यदिनाच्या 10 घोषणा, वाचा कुणी लिहिल्या
- ‘वंदे मातरम्’ – बंकिमचंद्र चटर्जी
- ‘इंकलाब जिंदाबाद’ – भगत सिंह
- ‘सत्यमेव जयते’ – पंडित मदनमोहन मालवीय
- ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा’ – नेताजी सुभाष चंद्र बोस
- ‘सारे जहां से अच्छा हिन्दोस्तां हमारा’ – अल्लामा इकबाल
- ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच’ – बाळ गंगाधर टिळक
- ‘आझाद ही रहे हैं, आझाद ही रहेंगे’ – चंद्रशेखर आजाद
- ‘विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा’ – श्यामलाल गुप्ता
- ‘जहां पवित्रता है, वहीं निर्भयता है’ – महात्मा गांधी
- ‘जय जवान, जय किसान’ – लाल बहादुर शास्त्री