Independence Day 2023 | यंदा 15 ऑगस्ट रोजी 1800 विशेष पाहुणे कोण?

15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजारोहणासाठी यंदा १८०० विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

Independence Day 2023 | यंदा 15 ऑगस्ट रोजी 1800 विशेष पाहुणे कोण?
Follow us
| Updated on: Aug 14, 2023 | 5:55 PM

Independence Day 2023 : 15 ऑगस्ट रोजी देश 77 वा स्वातंत्र्य दिन ( Independence day ) साजरा करणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Pm Narendra Modi ) लाल किल्ल्यावरून ( Red Fort ) दहाव्यांदा देशाला संबोधित करणार आहेत. नेहमी प्रमाणे यंदाही चोख सुरखा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दिल्लीत 10 हजारांहून अधिक जवान तैनात करण्यात आले आहेत. यंदा स्वातंत्र्य दिनानिमित्त 1800 विशेष पाहुणे उपस्थित राहणार आहेत. या पाहुण्यांमध्ये 400 हून अधिक सरपंच तसेच 660 हून अधिक ‘व्हायब्रंट गावातील लोकं समाविष्ट आहेत. यंदा त्यांना कार्यक्रमासाठी खास निमंत्रण पाठवण्यात आले आहे. एवढेच नाही तर शेतकरी उत्पादक संघटना योजनेशी संबंधित 250 जणांचाही समावेश करण्यात आला आहे.

मजबूत सुरक्षा व्यवस्था

स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपने (SPG) लाल किल्ल्यावरची जबाबदारी घेतली आहे. स्वातंत्र्यदिनी 1000 कॅमेऱ्यांशिवाय ड्रोनविरोधी यंत्रणाही बसवण्यात आली आहे. लष्कराचे हेलिकॉप्टरवर अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेले कमांडो पथक आकाशातून बारीक नजर ठेवणार आहे. पंतप्रधान आणि इतर व्हीव्हीआयपी पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी स्नायपर, एलिट SWAT कमांडो आणि शार्पशूटर्स तैनात केले जाणार आहेत. लाल किल्ला परिसरातील प्रत्येक कोपऱ्यावर सुरक्षा कर्मचारी लक्ष ठेवतील. SWAT कमांडो आणि NSG कमांडोसोबतच दिल्ली पोलीस आणि पॅरा मिलिटरी फोर्सचे जवानही तैनात असतील.

12 सेल्फी पॉइंट

दिल्लीत 12 ठिकाणी सेल्फी पॉइंट बनवण्यात आले आहेत. यामध्ये नॅशनल वॉर मेमोरियल, इंडिया गेट, विजय चौक, नवी दिल्ली रेल्वे स्टेशन, प्रगती मैदान, राज घाट, जामा मशीद मेट्रो स्टेशन, राजीव चौक मेट्रो स्टेशन, दिल्ली गेट मेट्रो स्टेशन, ITO मेट्रो गेट, नौबत खाना आणि शीश गंज गुरुद्वाराचा समावेश आहे. लोकांच्या सोयीसाठी या ठिकाणी काही विशेष व्यवस्थाही करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. यावेळी त्यांचा पोशाख देखील विशेष आकर्षणाचं केंद्र असतो. पंतप्रधान मोदी यंदा आपल्या भाषणात कोणते मुद्दे मांडतात याकडे ही देशाचं लक्ष लागून आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.