PM Modi Speech: समान नागरी कायदा, बांग्लादेशातील हिंदूंची सुरक्षा, विकसित भारत.. मोदींच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

देशाच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित केलं. लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात त्यांनी समान नागरी कायदा, बांग्लादेशातील हिंदुंची सुरक्षा असे अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. मोदींच्या भाषणातील दहा महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊयात..

PM Modi Speech: समान नागरी कायदा, बांग्लादेशातील हिंदूंची सुरक्षा, विकसित भारत.. मोदींच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे
PM Narendra ModiImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Aug 15, 2024 | 10:44 AM

देशभरात आज 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातोय. स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी ते अनेक महत्त्वाच्या विषयांवर व्यक्त झाले. युनिफॉर्म सिव्हिल कोड, संविधान आणि बांग्लादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबद्दलही ते बोलले. मोदींच्या या भाषणातील दहा महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत, ते पाहुयात..

  • स्पेस सेक्टर- स्पेस सेक्टर हे भविष्य आहे. महत्त्वाचा पैलू आहे. स्पेस सेक्टरमध्ये बऱ्याच सुधारणा केल्या आहेत. स्पेस सेक्टरमध्ये अनेक स्टार्टअप येत आहेत. आम्ही दूरगामी विचार करुन स्पेस सेक्टर मजबूत करत आहोत. आज प्रायव्हेट रॉकेट लॉन्च होत आहेत. उपग्रह सोडले जात आहेत. आज देशात नवीन संधी निर्माण झाल्या आहेत.
  • मध्यमवर्गीय- मध्यमवर्गीय देशाला भरपूर काही देतो. त्यामुळे देशाची पण त्याच्याप्रती जबाबदारी आहे. 2047 पर्यंत लोकांच्या आयुष्यात सरकारचा हस्तक्षेप कमी झाला पाहिजे, हे माझं स्वप्न आहे. गरज असेल तेव्हा सरकार तिथे असेल, असं पीएम मोदी म्हणाले.
  • शिक्षा निती- नवीन उंची गाठण्यासाठी पुढे जायचं आहे. आज नवीन शिक्षा निती आणली आहे, जी 21 व्या शतकाच्या अनुरुप आहे. माझ्या देशातील युवकांना शिक्षणासाठी परदेशात जायची गरज लागू नये अशी शिक्षा नितीवर काम करत आहोत, असं पीएम मोदी म्हणाले.
  • वैद्यकीय शिक्षण- मेडीकल शिक्षणावर लाखो रुपये खर्च होतात. यात आम्ही मागच्या 10 वर्षात मेडीकल सीट वाढवून 1 लाख केल्या आहेत. दरवर्षी 25 हजार युवांना मेडीकल शिक्षणासाठी परदेशात जावं लागतं. पुढच्या पाच वर्षात मेडीकल क्षेत्रात 75 हजार नवीन जागा निर्माण करणार आहोत. 2047 साली विकसित भारत स्वस्थ भारत असला पाहिजे” असं पीएम मोदी म्हणाले.
  • गेमिंग- भारत बेस्ट क्वालिटीसाठी ओळखला गेला पाहिजे. इंडियन स्टँडर्ड हे आंतरराष्ट्रीय स्टँडर्ड बनलं पाहिजे. ते उत्पादनाच्या क्वालिटीवर अवलंबून आहे, क्वालिटीवर भर द्यावा लागेल. डिझायनिंग क्षेत्रात बरंच काही नवीन देऊ शकतो. आज गेमिंगचं खूप मोठं मार्केट आहे. गेमिंगमध्ये नवीन टॅलेंट आहे. विश्वातील मुलांना गेमिंगकडे आकर्षित करु शकतो. भारताचे युवा, आयटी प्रोफेशनल, AI प्रोफेशन्लसनी गेमिंगकडे लक्ष दिलं पाहिजे. आपली गेमिंग उत्पादनं जगात पोहोचली पाहिजेत, असं पीएम मोदी म्हणाले.
  • बांग्लादेशातील हिंदू- “बांग्लादेशात जे काही झालंय, त्याबद्दल चिंता आहे. मी आशा करतो, तिथे परिस्थिती सामान्य होईल. बांग्लादेशात हिंदू, अल्पसंख्याक समुदायाची सुरक्षा सुनिश्चित झाली पाहिजे. शेजारी देशात सुख, शांती नांदावी हीच नेहमी भारताची भूमिका राहिली आहे. त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमचे तसे संस्कार आहेत. बांग्लादेशाच्या विकास यात्रेत आमचं शुभचिंतन राहील”, असं मोदी म्हणाले.
  • सेक्युलर सिव्हिल कोड- सेक्युलर सिव्हिल कोड ही वेळेची गरज आहे. धर्माच्या आधारावर भेदभावातून मुक्ती मिळाली पाहिजे. परिवारवाद आणि जातीयवादातून मुक्ती आवश्यक आहे. चुकीच्या कायद्यांना आधुनिक समाजात स्थान नाही असं पीएम मोदी म्हणाले.
  • बँकिंग- आधी बँका संकटात होत्या. बँकिंग सेक्टर मजबूत बनवण्यासाठी अनेक सुधारणा केल्या. त्यामुळे बँका मजबूत झाल्या. मध्यमवर्गीयांची स्वप्न पूर्ण करण्याची ताकद बँकांमध्ये आहे. शिक्षणासाठी, परदेशात जाण्यासाठी तसंच अन्य कामांसाठी लोन हवं असेल तर ते बँकांमुळे शक्य होतं. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. पण लोकांना मायबाप कल्चरचा सामना करावा लागला. सतत सरकारकडे मागावं लागायचं. आज सरकार स्वत: लोकांपर्यंत जातंय”, असं पीएम मोदी म्हणाले.
  • नैसर्गिक आपत्ती- देशाच्या विविध भागांमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तींचाही उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात केला. “या आपत्तींमध्ये अनेकांनी आपल्या कुटुंबीयांना, प्रियजनांना गमावलंय. आज मी त्या सर्व बाधिक लोकांप्रती मनापासून सहानुभूती व्यक्त करतो. त्यांना मी आश्वासन देतो की आम्ही या कठीण प्रसंगी त्यांच्या पाठिशी उभे आहोत”, असं मोदी म्हणाले.
  • कोलकातामध्ये प्रशिक्षणार्थी वैद्यकीय विद्यार्थिनीवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणी देशभरात झालेल्या व्यापक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील महिलांवरील अत्याचाराच्या मुद्द्यावरही व्यक्त झाले. “मला लोकांच्या आक्रोशाची जाणीव आहे. महिलांवरील अत्याचारासाठी दिलेल्या शिक्षेचा व्यापक प्रचार करण्याची गरज आहे. जेणेकरून परिणामाची भीती आरोपींमध्ये निर्माण होईल.”
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.