India-America Deal : सीमेवर चीनला दणका देण्यासाठी भारत-अमेरिकेमध्ये एक मोठी डील जवळपास फायनल

India-America Deal : भारत-अमेरिकेमध्ये ही डील झाल्यास चीनला लागून असणाऱ्या सीमेवर गेमचेंजर ठरेल. मागच्या काही वर्षांपासून भारत-चीनमध्ये तणाव वाढत आहे. दोन्ही देशांच सैन्य सीमेवर तैनात आहे. अमेरिकेने भारत-चीन सीमावादात नेहमीच भारताची बाजू घेतली आहे.

India-America Deal : सीमेवर चीनला दणका देण्यासाठी भारत-अमेरिकेमध्ये एक मोठी डील जवळपास फायनल
Modi-Biden
Follow us
| Updated on: Jun 21, 2024 | 4:53 PM

भारत-अमेरिकेमध्ये एका डील संदर्भात बोलणी सुरु आहेत. स्ट्रायकर टँक संदर्भात ही डील आहे. ही डील फायनल झाल्यास चीनला लागून असलेल्या सीमेजवळ भारताला मोठी ताकद मिळेल. या स्ट्रायकर टँकचा समावेश झाल्यास ते भारतीय सैन्यासाठी गेम चेंजर ठरतील. दोन्ही देशांमध्ये स्ट्रायकर आर्मर्ड फायटिंग व्हीकलच्या उत्पादनासंदर्भात चर्चा अंतिम टप्प्यात आहे. या करारानंतर आर्मर्ड व्हीकलचा उत्पादन भारतात होऊ शकेल. अमेरिकेने भारताकडे आठ चाकी स्ट्रायकरचा वेग आणि मारक क्षमतेच प्रदर्शन करण्याचा प्रस्ताव सुद्धा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारत अमेरिकेकडून 150 स्ट्रायकर टँक विकत घेऊ शकतो. आज भारत मेक इन इंडियाच्या धर्तीवर नव्या शस्त्रास्त्र निर्मितीवर काम करत आहे. स्ट्रायकर संदर्भात भारत-अमेरिकेमध्ये डील फायनल झाली, तर भारत फक्त सह उत्पादनच करणार नाही, तर अमेरिका याची टेक्नोलॉजी सुद्धा ट्रान्सफर करेल. या डीलसाठी भारताचे 13 वेंडर शर्यतीत आहेत.

म्हणून अमेरिकेने भारतला दिला प्रस्ताव

करार अंतिम झाल्यानंतर भारतीय प्रदेशाला अनुकूल ठरणारी टेक्नोलॉजी त्यामध्ये आणावी लागेल. यात लडाख आणि सिक्कीम सारख्या उंच प्रदेशात सुद्धा हे टँक सहजतेने हाताळता आले पाहिजेत. चीनला लागून असणाऱ्या सीमेजवळ भारताला अशा टँकची आवश्यकता आहे. उंच डोंगराळ भागातही हे टँक उपयुक्त ठरले पाहिजेत. हीच उपयुक्तता पटवून देण्यासाठी अमेरिकेने भारताकडे स्ट्रायकरची गती आणि मारक क्षमता याच प्रदर्शन करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

स्वदेशीकरण करण्याचा प्रयत्न

आधी अमेरिकेकडून हे टँक विकत घ्यायचे. नंतर भारतात संयुक्त उत्पादन करायच व भविष्यातील वर्जन विकसित करायच असा कार्यक्रम आहे. स्ट्रायकरच मोठ्या प्रमाणात स्वदेशीकरण करण्याचा प्रयत्न असेल. टेक्नोलॉजी ट्रान्सफर यामध्ये आहे. संरक्षण क्षेत्रातील सरकारी आणि खासगी कंपन्या या मध्ये भागीदार असतील.

स्ट्रायकरची खासियत काय?

स्ट्रायकर आठ चाकी वाहन आहे. जनरल डायनेमिक्स लँड सिस्टम्स (GDLS) कॅनडा आणि संयुक्त राज्य अमेरिकेच्या जनरल डायनेमिक्स लँड सिस्टम्स डिवीजन यांनी मिळून विकसित केलं आहे.

टेक्निकी स्तरावर स्ट्रायकर सैन्यातील एक चिलखती वाहन आहे.

या वाहनात 30 मिमी तोप आणि 105 मिमी मोबाइल गन असते.

स्ट्रायकरमध्ये 9 सैनिक बसू शकतात.

यात 350 हॉर्सपावरच कॅटरपिलर C7 इंजिन आहे.

स्ट्रायकरची रेंज 483 किलोमीटर आहे.

स्ट्रायकर 100 किमी प्रतितास वेगाने पोहोचू शकतं.

स्ट्रायकरमध्ये अन्य हलक्या सैन्य वाहनाच्या तुलनेत IED पासून वाचण्याची जास्त शक्यता आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.