केंद्र सरकारचं ‘मिशन रेमडेसिवीर’; इजिप्त, उज्बेकिस्तान, यूएई आणि बांग्लादेशशी संपर्क सुरू

देशात रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. (India approaches Egypt, UAE, Uzbekistan, Bangladesh for Remdesivir)

केंद्र सरकारचं 'मिशन रेमडेसिवीर'; इजिप्त, उज्बेकिस्तान, यूएई आणि बांग्लादेशशी संपर्क सुरू
remdesivir injection
Follow us
| Updated on: Apr 29, 2021 | 2:31 PM

नवी दिल्ली: देशात रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. रेमडेसिवीरचा तुटवडा दूर करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीची पावलं उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने इजिप्त, उज्बेकिस्तान, यूएई आणि बांग्लादेशकडून रेमडेसिवीर खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून या देशांशी संपर्कही सुरू केला आहे. (India approaches Egypt, UAE, Uzbekistan, Bangladesh for Remdesivir)

अमेरिकेची फार्मा कंपनी गिलीएड सायन्सने भारताला 4.50 लाख इंजेक्शन देण्यास होकार दिला आहे. तसेच भारतात रेमडेसिवीरचं उत्पादन वाढावं म्हणून कच्चा माल देण्याचाही निर्णय घेतला आहे. रेमडेसिवीरचा तुटवडा पाहता केंद्राने रेमडेसिवीरच्या निर्यातीवर बंदी घातली होती. केंद्राने रेमडेसिवीरचं प्रती माह उत्पादन 78 लाख वायल पर्यंत वाढवण्याचं आधीच सांगितलं होतं. रेमडेसिवीरच्या सात मॅन्यूफॅक्चर्सची सध्याची उत्पादन क्षमता 38.80 लाख वायल प्रति माह असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं होतं.

अमेरिकेची मदत

उद्या शुक्रवारी अमेरिकेडून ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन कन्स्ट्रटेरसहीत इतर औषधांची पहिली खेप येण्याची शक्यता आहे. सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार अमेरिका एस्ट्राजेनेकाचे एक कोटी डोस भारताला देणार आहे. त्या शिवाय पाच कोटी डोसचे उत्पादन विविध टप्प्यात आहे. भारताने अमेरिकेकडे व्हॅक्सिनच्या तयार डोससह कोविड व्हॅक्सिनच्या उत्पादनासाठी कच्च्या मालाची मागणीही केली आहे.

अनेक देश मदतीसाठी सरसावले

भारतातील कोरोनाची परिस्थिती पाहता चीननेही भारताला मदतीचा प्रस्ताव दिला आहे. मात्र भारताने अद्याप त्यावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. पाकिस्ताननेही भारताला मदतीचा हात पुढे केला असून भारताने त्यावरही काही प्रतिक्रिया दिलेली नाही. अमेरिका, रशिया, फ्रान्स, जर्मनी, यूके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, बेल्झियम, रोमानिया, लक्समबर्ग, सिंगापूर, पोर्तुगाल, स्विडन, न्यूझीलंड, कुवेत आणि मॉरिशससहीत अनेक देशांनी भारताला मदतीचा हात दिला आहे. सिंगापूरने भारताला 256 ऑक्सिजन सिलिंडर गिले आहेत. नॉर्वे सरकारनेही भारताला वैद्यकीय सेवेसाठी 24 लाख अमेरिकन डॉलर्सची मदत देणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच स्वित्झर्लंडनही भारताला ऑक्सिजन कन्संट्रेटर, व्हेंटिलेटर आणि अन्य वैद्यकीय उपकरणे देत आहे. त्याशिवाय अनेक देशांनी भारताला ही वैद्यकीय मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. (India approaches Egypt, UAE, Uzbekistan, Bangladesh for Remdesivir)

संबंधित बातम्या:

काहीही करून ऑक्सिजनचं संकट दूर करा, लोक मरत आहेत; दिल्ली हायकोर्टाचे केंद्र सरकारला निर्देश

पीपीई किट, आरटीपीसीआर चाचणी सक्तीची, मतमोजणीसाठी पोलिंग एजंटांना निवडणूक आयोगाची गाईडलाईन

गौतम गंभीर यांच्याकडे औषधे वाटप करण्याचं लायसन्स आहे काय?; कोर्टाचा ‘गंभीर’ सवाल

(India approaches Egypt, UAE, Uzbekistan, Bangladesh for Remdesivir)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.