India-Canada Row : भारताने असा निर्णय घेतला, तर कॅनडाचा सगळा अहंकार उतरेल, फक्त इतकच करावं लागेल की…
India-Canada Row : भारत-कॅनडामध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. जस्टिन ट्रुडो यांनी नेहमीच भारतविरोधातील शक्तींना मायदेशात बळ दिलय. त्यांचं हे राजकारण भारताला मान्य नाहीय. स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणारे दहशतवादी कॅनडात बिनधास्त राहू शकतात, फिरु शकतात. आपल्या राजकीय स्वार्थासाठी ट्रुडो सरकार त्यांचा वापर करत आहे.
कॅनडा आणि भारतामध्ये तणाव वाढत चालला आहे. भारताने कॅनडातील आपले उच्चायुक्त आणि अन्य राजनैतिक अधिकाऱ्यांना परत बोलवण्याची घोषणा केली आहे. यामुळे दोन्ही देशामध्ये पुन्हा तणाव वाढू लागला आहे. कॅनडाची हे असच वर्तन राहिलं, तर त्याचा परिणाम दोन्ही देशाचे संबंध आणखी बिघडण्यात होईल. भारताकडे कॅनडाला कोंडीत पकडण्याची संधी आहे. भारताने उद्या असा काही निर्णय घेतला, तर कॅनडाच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा त्याचा परिणाम होईल.
द्विपक्षीय व्यापाराशिवाय कॅनडा भारतीय विद्यार्थ्यांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. कॅनडाच्या अशा वागण्यामुळे संबंध बिघडले, तर त्याचा कॅनडाच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा परिणाम होईल. कॅनडात मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी जातात. कॅनडाच्या कॉलेजसाठी पैशांचा हा मोठा स्त्रोत आहेत. सहाजिकच अर्थव्यवस्थेला सुद्धा त्याचा फायदा होतो. भारतीय विद्यार्थ्यांच कॅनडाच्या अर्थव्यवस्थेमध्ये किती योगदान आहे? समजून घेऊया.
भारतीय विद्यार्थ्यांच किती लाख कोटीच योगदान?
भारत सरकारच्या डाटानुसार, 13 लाखापेक्षा जास्त भारतीय विद्यार्थी परदेशात शिक्षण घेत आहेत. दरवर्षी भारतीय मोठ्या संख्येने शिक्षणासाठी परदेशात जात असतात. सर्वाधिक भारतीय विद्यार्थ्यांची पहिली पसंती कॅनडा आहे. सध्या कॅनडात 4 लाख 27 हजार भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कॅनडामध्ये 40 टक्के भारतीय विद्यार्थी आहेत. त्यांचं कॅनडाच्या अर्थव्यवस्थेत अडीच लाख कोटींच योगदान आहे. यामुळे कॅनडाची अर्थव्यवस्था मजबूत होतेय.
परदेशी विद्यार्थी कॅनडात किती लाख फि भरतात?
कॅनडाला भारतीय विद्यार्थ्यांची पहिली पसंती यासाठी आहे, कारण अन्य देशांच्या तुलनेत इथे फी कमी आहे. कॅनडाच्या नागरिकांसाठी ही फी अजूनच कमी आहे. परदेशी विद्यार्थ्यांना चारपट जास्त फी भरावी लागते. सरकारी आकड्यांनुसार भारतीयांसह परदेशी विद्यार्थी कॅनडामध्ये सरासरी 8.7 लाख रुपये फी भरतात.
अर्थव्यवस्थेत परदेशी विद्यार्थ्यांच किती योगदान?
भारतीय विद्यार्थी कॅनडाच्या अर्थव्यवस्थेत फक्त फी आणि शिक्षणाच्या माध्यमातूनच योगदान देत नाहीयत, तर नोकरी करुनही त्या देशाची अर्थव्यवस्था पुढे नेत आहेत. 2022 च्या डाटानुसार, कॅनडाच्या अर्थव्यवस्थेत परदेशी विद्यार्थ्यांच योगदान 22.3 बिलियन डॉलरच होतं. यात 10.2 बिलियन डॉलर म्हणजे 85 हजार कोटी रुपये एकट्या भारतीय विद्यार्थ्यांच योगदान आहे.
भारताने असा निर्णय घेतला, तर काय होईल?
इतकच नाही, कॅनडात अनेक कॉलेज, यूनिवर्सिटीज भारताच्या बळावर चालत आहेत. भारतीय विद्यार्थ्यांनी या कॉलेजसमध्ये प्रवेश घेतला नाही, नोकरी केली नाही, तर ट्रुडो यांचा सगळा अहंकार उतरेल. भारत सरकारने भारतीय विद्यार्थ्यांवर बंदी घातली, तर कॅनडाच्या अर्थव्यवस्थेच कमीत कमी 85 हजार कोटी रुपयांच नुकसान होईल.