India vs Canada Issue | अमेरिका नक्की कोणाच्या बाजूने आपल्या की कॅनडाच्या?

India vs Canada Issue | अमेरिकेने काय म्हटलय आता?. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची 18 जून रोजी कॅनडाच्या एका गुरुद्वाराबाहेर गोळी झाडून हत्या करण्यात आली होती.

India vs Canada Issue | अमेरिका नक्की कोणाच्या बाजूने आपल्या की कॅनडाच्या?
India vs canada
Follow us
| Updated on: Sep 26, 2023 | 12:04 PM

नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर हत्याकांडावरुन भारत आणि कॅनडाच्या संबंधात तणाव आहे. दोन्ही देशांचे संबंध नाजूक वळणावर आहेत. हा तणाव, वाद कधी शांत होणार, हे कोणीही सांगू शकत नाही. जगातील अन्य देशांची नजर भारत आणि कॅनडावर आहे. अमेरिका दोन्ही देशात होणारे निर्णय आणि वक्तव्यावर लक्ष ठेवून आहे. अमेरिका हे प्रकरण फॉलो करतोय, या दरम्यान अमेरिकेच एक मोठ वक्तव्य समोर आलय. हरदीप सिंह निज्जरच्या हत्या प्रकरणात कॅनडाने तपास पुढे सुरु ठेवावा असं अमेरिकेने म्हटलं आहे. गुन्हेगारांना शासन झालं पाहिजे. मागच्या आठवड्यात कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी निज्जर हत्याकांडासाठी भारताला जबाबदार ठरवलं होतं. निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. भारताने कॅनडाचे पीएम ट्रूडो यांचे आरोप फेटाळून लावले होते.

“कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या आरोपांनी आम्ही चिंतित आहोत. आम्ही आमचे सहकारी कॅनडाच्या संपर्कात आहोत. कॅनडाने या प्रकरणात तपास पुढे न्यावा. आरोपींना शासन झालं पाहिजे. आम्ही भारत सरकारला कॅनडाच्या तपासात सहकार्य करण्याच आवाहन केलं आहे” असं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर म्हणाले. भारताने या संपूर्ण प्रकरणात कठोर भूमिका घेतली आहे. त्यानंतर कॅनडाचे पीएम ट्रुडो नरमले आहेत. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने त्यांचे सूर बदलले आहेत. त्यांच्या मंत्र्याने भारतासोबतचे संबंध महत्त्वाच असल्याच म्हटलं आहे. निज्जर हत्याकांडाच्या तपासात भारताकडून सहकार्य हवय असं पंतप्रधान जस्टिन ट्रूडो म्हणाले. त्यांनी भारतासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केलीय.

जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची 18 जून रोजी कॅनडाच्या एका गुरुद्वाराबाहेर गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. कॅनडाचे पीएम ट्रूडो यांनी 18 सप्टेंबरला या हत्येसाठी भारताला जबाबदार ठरवलं. त्यानंतर कॅनडाने भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याला निष्कासित केलं. प्रत्युत्तरात भारताने सुद्धा तशीच कारवाई केली. भारताने सुद्धा कॅनडाच्या डिप्लोमॅटला बाहेरचा रस्ता दाखवला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.