India-Maldives Row : भारताच्या मास्टर स्ट्रोकने मालदीव हैराण, चीन टेन्शनमध्ये, अशी काय चाल खेळली?
India-Maldives Row : रणनितीक दृष्टीने भारतासाठी मालदीव महत्त्वाचा देश आहे. हिंद महासागरात भारताला मालदीवची गरज आहे. पण सध्या मालदीव त्यांचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष मुइज्जू चीन धार्जिणे असल्याने त्या बाजूला झुकला आहे. आता भारताने एक नवी गुगली टाकलीय. त्यामुळे मालदीव सुद्धा हैराण आहे आणि त्यांचा पाठिराखा चीन टेन्शनमध्ये आलाय.
भारत आणि मालदीवमध्ये संबंध बिघडताच चीनने फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. हे सगळ्या जगाला माहित आहे. भारताने मालदीव संदर्भात आपली चाल बदलली आहे. मोदी सरकारने एक नवी चाल खेळलीय. त्यामुळे मालदीवची बोलती बंद झालीय. दुसऱ्याबाजूला चीन सुद्धा गडबडलाय. मालदीवमधल्या नव्या सरकारने इंडिया आऊटचे नारे दिले. पर्यटनाच्या दृष्टीने मालदीवसाठी भारत मोठा रेवेन्यू सोर्स आहे. अनेक भारतीय टूरिस्ट मालदीवला जातात. चीनने मालदीवच्या मैत्रीच्या आडून या स्थितीची फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. भारताने चालू आर्थिक वर्षात मालदीवला अंडी, बटाटे, कांदे, तांदूळ, गव्हाच पीठ, साखर आणि डाळ या सारख्या वस्तुंची मर्यादीत प्रमाणात निर्यात करण्यावरील प्रतिबंध हटवले.
डीजीएफटीच्या एका अधिसूचनेत म्हटलय की, आर्थिक वर्ष 2024-25 दरम्यान दोन्ही देशांमध्ये व्यापारी करारातंर्गत मालदीवला या वस्तुंची निर्यात करण्याची परवानगी देण्यात आलीय. मालदीवला अंडी, बटाटे, कांदे, तांदूळ, गव्हाच पीठ, साखर आणि डाळ या वस्तुंची निर्यात करण्याची परवानगी देण्यात आलीय, अशी डीजीएफटीने माहिती दिली. या वस्तुंच्या निर्यातील मर्यादीत प्रमाणात परवानगी दिली जाते.
चीनला मिलिट्री इन्फ्रास्ट्रक्चरची परवानगी
मालदीवचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष मुइज्जू चीनचे मोठे सपोर्टर आहेत. मुइज्जू मालदीवचे राष्ट्रपती झाल्यानंतर चीनसोबत सैन्य करारही केला. त्या अंतर्गत मालदीवच्या बेटावर चीनला मिलिट्री इन्फ्रास्ट्रक्चर उभ करण्याची परवानगी मिळाली. दुसऱ्याबाजूला चीन मालदीवला भारताविरोधात नेहमीच भडकवत आलाय. रणनितीक गरज लक्षात घेता, भारताने मालदीवसोबत चांगले संबंध ठेवण गरजेच आहे.
मालदीवसाठी दरवाजे उघडले
भारत सरकारच्या निर्यातीवरील प्रतिबंध हटवण्याच्या निर्णयाने मालदीव हैराण आहे. त्याचवेळी चीनची चिंता वाढली आहे. सरकारने हा निर्णय तेव्हा घेतलाय, जेव्हा मालदीवने भारताविरोधात अनेक निर्णय घेतलेत. भारताने कठोर भूमिका सोडून मालदीवला दिलासा दिलाय. यामुळे दोन्ही देशातील कटुता संपवण्यास मदत मिळेल. दुसऱ्याबाजूला चीनची हालत यामुळे खराब आहे, कारण भारताने आपल्या रणनितीने मालदीवसाठी दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे चीनच्या मालदीवच्या आणखी जवळ जाण्याच्या रणनितीला ब्रेक लागू शकतो.