India, China Dispute : ‘एलएसी’वर आज भारत-चीनमध्ये कमांडर स्तरावरील बैठकीची 16 वी फेरी

आज भारत आणि चीनी लष्करी अधिकाऱ्यांमधील चर्चेच्या 16 व्या फेरीला सुरुवात झाली आहे. आजच्या या बैठकीमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबत (Line of Actual Control) अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

India, China Dispute : 'एलएसी'वर आज भारत-चीनमध्ये कमांडर स्तरावरील बैठकीची 16 वी फेरी
Follow us
| Updated on: Jul 17, 2022 | 3:05 PM

नवी दिल्ली: भारत आणि चीनमध्ये संघर्ष सुरूच आहे. अनेकदा पूर्व लडाखच्या (Eastern Ladakh) मुद्द्यावरून भारत -चीनचे सैन्य आमने-सामने (China India Border Dispute) आल्याचे पहायला मिळाले. मात्र आता हा वाद चर्चेद्वारे सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर भारत आणि चीनी लष्कारातील उच्चस्थरीय अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या 15 फेऱ्या झाल्या आहेत.या 15 फेऱ्यांमध्ये काही भागांवरील वाद मिटवण्यात यश आले आहे. मात्र अद्यापही काही भागातील वाद सुटला नसल्याने चर्चेचे सत्र सुरूच आहे. आज भारत आणि चीनी लष्करी अधिकाऱ्यांमधील चर्चेच्या 16 व्या फेरीला सुरुवात झाली आहे. आजच्या या बैठकीमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबत (Line of Actual Control) उर्वरीत मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये देखील काही मुद्दे निकाली निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

11 मार्च रोजी झाली होती 15 वी फेरी

सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार ही बैठक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या भारतीय बाजुवरील चोशुल मोल्डो मीटिंग पॉईंटवर सुरू आहे. आज भारत आणि चीनी सौनिकांमध्ये सुरू असलेल्या या बैठकीमध्ये अनेक महत्त्वांच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच भारत चीनला ज्या जागांबाबत दोन्ही देशांमध्ये वाद आहे. त्या जागेवरील सैन्य माघारी घेण्यास सांगण्याची शक्यता आहे. यापूर्वी दोन्ही देशात शेवटची बैठक ही 11 मार्च रोजी झाली होती. आतापर्यंत चीन आणि भारतादरम्यान अशा चर्चेच्या एकूण 15 फेऱ्या झाल्या आहेत. या चर्चेमधून अनेक विषयांवर तोडगा काढण्यात यश मिळाल्याची माहिती समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा

जयशंकर यांची चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांसोबत चर्चा

दरम्यान यापूर्वी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी सात जुलै रोजी चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी यांच्यासोबत चर्चा केली होती. या बैठकीमध्ये पूर्व लडाखमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीबाबत चर्चा करण्यता आली. तसेच जी 20 देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची एक बैठक झाली होती. या बैठकीत देखील जयशंकर यांनी पूर्व लडाखचा मुद्दा उपस्थित करत तिथे निर्माण झालेल्या परिस्थितीवर लवकरात लवकर तोडगा काढण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले होते.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.