100 कोटी लोकांचे लसीकरण झाले. आता भारत कोरोनापासून सुरक्षित आहे का?

75 टक्के लोकांना लसीचा पहिला डोस मिळालेला आहे आणि जवळपास 31 टक्के लोकंना दोन्ही डोस मिळून लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र असं असूनही भारत आता कोरोना वायरसपासून सुरक्षित आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.

100 कोटी लोकांचे लसीकरण झाले. आता भारत कोरोनापासून सुरक्षित आहे का?
लसीकरणाबाबत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
Follow us
| Updated on: Oct 21, 2021 | 3:36 PM

मुंबई: आज भारताने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा (Covid Vaccination) 100 कोटीचा टप्पा पार करून एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. केंद्रिय आरोग्य मंत्रालयाच्या महितीनुसार गुरूवार सकाळप्रर्यंत एकूण पात्र जनतेपैकी 75 टक्के लोकांना लसीचा पहिला डोस मिळालेला आहे आणि जवळपास 31 टक्के लोकंना दोन्ही डोस मिळून लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र असं असूनही भारत आता कोरोना वायरसपासून सुरक्षित आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे. (india completes 100 crore vaccination)

तिसऱ्या लाटेचा धोका टळलेला नाही

तज्ज्ञांनुसार भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही . कोरोनाची लस ही विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका कमी करते आणि कोविड झाल्यास गंभीर आजारपण रोकते. मात्र आता वायरसचा जो डेल्टा व्हेरिएंट आहे तो मुळ कोरोना विषाणूपेक्षा आक्रमक आहे आणि वेगाने पसरतो ज्यामुळे कोविड संक्रमणाचा धोका वाढतो. काही देशांमध्ये डेल्टा प्लस या कोरोना विषाणू व्हेरिएंटचं संक्रमण सुरू झालंय. त्यामुळे सरकारने, आरोग्य विभागाने आणि लोकांनी तेवढीच काळजी घेणे गरजेचे आहे. येणारे सणवार आणि बाजारपेठांमध्ये सुरू झालेली लोकांची गर्दी पाहता जास्त सतर्क राहण्याची गरज आहे.

भारतात 21 ऑक्टोबरपर्यंत कोरोनाचे 14,623 नवीन रूग्ण सापडले आणि एकूण कोरोना संक्रमणाची संख्या आता 3,41,08,996 वर पोहोचली आहे. तर सक्रिय रूगणांची संख्या 1,78,098  असून रुग्णसंख्या कमी झाली आहे.

ब्रिटनमध्ये डेल्टा व्हेरिएंटचं आक्रमण

ब्रिटनमध्ये 89 टक्के लोकांचं लसीकरण झालेलं आहे. मात्र डेल्टा व्हेरिएंटमुळे तिथे कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. मागच्या काही दिवसांपासून ब्रिटनमध्ये दररोज 40,000 पेक्षा जास्त रुग्णांची नोंद होतेय. 20 ऑक्टोबरला डेल्टा व्हेरिएंटचे 48,545 नवे रूग्ण सापडले. या सर्व रुग्णांना कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण झाल्याचं सांगितलं जातंय.

आमेरीकेतही मागच्या महिन्यात डेल्टा व्हेरिएंटमुळे संक्रमण वाढले होते आणि दररोज 1,50,000 पर्यंत रूग्ण सापडत होते. 20 ऑक्टोबरला आमेरिकेत 86,595 नवीन रूग्ण सापडले. मात्र आमेरिकेत आतापर्यंत जवळपास फक्त 50 टक्के लोकांच लसीकरण झालेलं आहे.

लस किती प्रभावी

जगभरातल्या तज्ज्ञांमध्ये  कोरोना प्रतिबंधक लसीकरणावर मतभेद आहेत. लस कोरोना विषाणू तसेच व्हेरिएंड्सविरूद्ध किती प्रभावी आहे याचेही चित्र स्पष्ट नाही. त्यामुळे जगभरात किंवा भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढेल का किंवा कधी वाढेल याचा अंदाज लावणे कठीण आहे.

भारतात 16 जानेवारीला 2021 ला लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली आणि 10 महिन्यात 100 कोटीचा टप्पा पार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 आखेरपर्यंत 100 टक्के पात्र लोकांच लसीकरणा करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. मात्र कोविडचं संक्रमण नियंत्रणात ठेवायचं आसेल तर लोकांनी लसीकरणासोबत कोरोना प्रतिबंधक नियम पाळणे गरजेचं आहे.

इतर बातम्या :

धक्कादायकः कोरोना लसीकरणानंतर डॉक्टरचा मृत्यू; इगतपुरीतल्या घटनेने खळबळ, ‘एईएफआय’ समितीच्या अहवालातही स्पष्ट उल्लेख

मोदी सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ

‘मंत्रालय बंद असताना शरद पवारांचे शागिर्द 15 हजार कोटी लुटत होते’, सोमय्यांचा पुन्हा मुश्रीफांवर घणाघात; राजीनाम्याचीही मागणी

(india completes 100 crore vaccination)

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.