Corona Vaccine : डबल म्यूटेंट व्हायरसवरही भारत बायोटेकची Covaxin लस प्रभावी, ICMRकडून स्पष्ट

भारत बायोटेकने निर्माण केलेली कोव्हॅक्सिन (Covaxin) ही लस SARS-CoV-2 च्या अनेक व्हेरिएंट्सवर परिणामकारक आहे.

Corona Vaccine : डबल म्यूटेंट व्हायरसवरही भारत बायोटेकची Covaxin लस प्रभावी, ICMRकडून स्पष्ट
covaxin
Follow us
| Updated on: Jul 15, 2021 | 5:29 PM

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रासह राज्य सरकारकडून सर्व प्रकारचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातच आता संपूर्ण लॉकडाऊनचा पर्यायही काही राज्यांनी निवडला आहे. अशावेळी ICMR कडून एक महत्वाची माहिती देण्यात आली आहे. भारत बायोटेकने निर्माण केलेली कोव्हॅक्सिन (Covaxin) ही लस SARS-CoV-2 च्या अनेक व्हेरिएंट्सवर परिणामकारक आहे. इतकच नाही तर कोव्हॅक्सिन ही डबल म्यूटेंट स्ट्रेन (Corona Double Mutant) विरोधातही प्रभावी असल्याचं ICMR ने म्हटलंय. (Bharat Biotech’s covaxin vaccine is effective against double mutant virus)

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)ने केलेल्या अभ्यासात सांगण्यात आलं आहे की, कोव्हॅक्सिन लस डबल म्यूटेंट स्ट्रेनचा प्रभाव कमी करण्यासाठी एक उपयुक्त कोरोना लस आहे. त्याचबरोबर SARS-CoV-2 च्या अनेक व्हेरिएंट्सचा प्रभाव कमी करण्यात ही लस महत्वाची भूमिका बजावत असल्याचंही ICMR ने म्हटलंय.

कोण-कोणत्या व्हेरिएंटवर कोव्हॅक्सिन प्रभावी?

ICMR-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (NIV) ने SARS-CoV-2 व्हायरसचे अनेक व्हेरिएंट्स यशस्वीरित्या वेगळे केले आहेत. त्यात UK व्हेरिएंटचा B.1.1.7, ब्राझिल व्हेरिएंट B.1.1.28, साऊथ आफ्रीकन व्हेरिएंट B.1.351 चा समावेश आहे. ICMR आणि NIV ने UK व्हेरिएंट विरोधात लढण्याची कोव्हॅक्सिनच्या क्षमतेचा अभ्यास केला. त्यानंतर ICMR ने सांगितलं आहे की, कोव्हॅक्सिन लस व्हायरसच्या डबल म्यूटेंटचाही परिणाम कमी करण्यात सक्षम आहे.

‘कोविशील्ड’ सरकारी आणि खासगी रुग्णालयात कितीला मिळणार?

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (SII) भारत सरकारच्या सूचनेनुसार कोविशील्ड (Covishield Vaccine) लशीची नवीन किंमत निश्चित केली आहे. एसआयआयने राज्य सरकारसाठी 400 रुपये आणि खासगी रुग्णालयांसाठी 600 रुपये प्रति डोस दराची घोषणा केली आहे. एसआयआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “येत्या दोन महिन्यांत लस उत्पादनाचा वेग वाढेल. आमच्या एकूण उत्पादन क्षमतेच्या 50 टक्के लस भारत सरकार लसीकरण मोहिमेला आणि उर्वरित 50 टक्के राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना देण्यात येईल.”

जगातील इतर कोणत्याही लसींच्या किंमतींपेक्षा आमची लस स्वस्त आहे, असे कंपनीने म्हटले आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या म्हणण्यानुसार अमेरिकेच्या लशीची किंमत प्रति डोस 1500 रुपये आहे, रशियन लसची किंमत 750 रुपये आहे आणि चिनी लशीसाठी प्रति डोस 750 रुपये मोजावे लागत आहे. सीरम संस्थेने असेही म्हटले आहे की, येत्या 4-5 महिन्यांनंतर ही लस मेडिकल दुकानांमध्ये उपलब्ध होऊ शकेल.

संबंधित बातम्या :

Covishield Vaccine | ठरलं! सरकारी रुग्णालयात 400 तर, खाजगी रुग्णालयात 600 रुपयांना मिळणार कोविशील्ड लसीचा डोस!

Coronavirus In India : कोरोनाच्या तिसऱ्या म्युटेंटची एन्ट्री? देशवासियांची धास्ती वाढवणारी बातमी

Bharat Biotech’s covaxin vaccine is effective against double mutant virus

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.