‘कोरोना प्रोटोकॉलचे पालन, 100 टक्के लसीकरणासाठी प्रयत्न करा’, जी किशन रेड्डी यांचे पूर्वोत्तर राज्यांना आवाहन
बुधवारी जी किशन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पूर्वोतर भागातील 8 राज्यांमध्ये कोरोनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला 8 राज्यांचे आरोग्यमंत्री, सचिव, संयुक्त सचिव, आरोग्य आणि कुटुंब नियोजन आणि पूर्वोत्त राज्यांमधील आरोग्य सचिवांसह अनेक अधिकारी सहभागी झाले होते.
नवी दिल्ली : देशात कोरोना प्रादुर्भाव (Corona Outbreak) पुन्हा एकदा वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी (G Kishan Reddy) यांनी पूर्वोत्तर राज्यांमधील कोरोना स्थितीबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी केंद्र सरकारने घालून दिलेल्या कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं. त्याचबरोबर आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये (RT-PCR Test) गती, होम आयसोलेशन, टेलीकंसल्टेशन प्लॅटफॉर्म, ई-संजीवनीच्या माध्यमातून रुग्णांवर नियमीत लक्ष ठेवण्यावरही जोर दिला. तसंच लवकरात लवकर 100 टक्के लसीकरणचं लक्ष्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. त्यात 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लवकरात लवकर लसीकरण करण्याची सूचनाही त्यांनी केलीय.
बुधवारी जी किशन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पूर्वोतर भागातील 8 राज्यांमध्ये कोरोनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला 8 राज्यांचे आरोग्यमंत्री, सचिव, संयुक्त सचिव, आरोग्य आणि कुटुंब नियोजन आणि पूर्वोत्त राज्यांमधील आरोग्य सचिवांसह अनेक अधिकारी सहभागी झाले होते. यावेळी जी किशन रेड्डी यांनी केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या एसओपी अनुसार सर्व कोरोना प्रोटोकॉलवर लक्ष केंद्रीय करण्याचा सल्ला दिला. तसंच पूर्वोत्तर राज्यांमधील आरोग्या विभागातील पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी एनईएसआयडीएस योजना आणि आपत्कालीन कोविड पॅकेजअंतर्गत राज्यांना दिलेल्या निधीचा वापर करण्याची सूनाही त्यांनी यावेळी केली.
To meet any challenges posed by the new variant, urged strengthening the health systems at the district level; monitoring and containment mechanisms also were discussed.
As PM Shri @narendramodi has indicated, we must be Satark and Saavdhan in view of the new variant. pic.twitter.com/MkrBr0pVA3
— G Kishan Reddy (@kishanreddybjp) January 12, 2022
आरटीपीसीआर चाचण्यांवर भर देण्याचा सल्ला
रेड्डी यांनी सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांना चिकित्सा आणि आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा वाढविणे, ओषधांची खरेदी, त्याचबरोबर कोरोनापासून बचावासाठी उपयुक्त सामान, ज्यात मास्क, पीपीई किट आणि ऑक्सिजन मशीन्स खरेदी करण्याचं आवाहन केलं. ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत जागृती निर्माण करण्यासाठी सर्व राज्यांना माध्यमांचा आणि वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रांचा वापर करण्याचा सल्ला दिला. तसंच केंद्रीय मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना आरटीपीसीआर चाचण्यांवर भर देण्याचीही सूचना केली आहे. तसंच सर्व पूर्वोत्तर राज्यांना टेलीकंसल्टेशन प्लॅटफॉर्म ई-संजीवनी वापरण्याचं आवाहन केलं आहे.
बैठकीत कोणत्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा?
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्र्यालयाने पूर्वोत्तर राज्यामध्ये कोरोना विरोधातील लढाईत आरोग्य विभागाकडून केलेल्या जाणाऱ्या प्रमुख उपाययोजनांचा आढाव घेण्यात आला. या बैठकीत खालील प्रमुख मुद्यांवर चर्चा झाली.
>> 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण
>> रुग्णालय, आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य सुविधांसह अतिरिक्त बेड्सची व्यवस्था
>> राज्य स्तरावर कोरोनाचा परिस्थितीचा आढावा
>> रोजच्या रोज कोरोना रुग्णांची आकडेवारी
>> अतिरिक्त लसींसाठी राज्य सरकारची केंद्राकडे मागणी
गृहमंत्र्यांच्या नेृतृत्वात टास्क फोर्सची निर्मिती
केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी राज्य सरकारांना कोरोना स्थितीतून निपटण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर मिळून काम करण्यासाठी आग्रह केला आहे. तसंच गृहमंत्र्यांच्या नेतृत्वात एक टास्क फोर्स गठीत करण्यात आलं. या माध्यमातून राज्यांसमोरील आव्हाने आणि समस्या दूर करण्यासाठी एकसाथ आणि सहकार्याच्या भावनेतून काम करण्यासाठी प्रयत्न करेल. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून कोरोना विरोधातील लढाईसाठी पूर्वोत्तर राज्यांना देण्यात आलेला निधी आरोग्य सुविधा वाढवण्यासह फिल्ट रुग्णालये, ऑक्सिजन बेड्ससाठी उपयोगात आणण्याचा सल्लाही यावेळी जी किशन रेड्डी यांनी दिलाय.
इतर बातम्या :