India vs Bharat | इंडियाच भारत बनवण्यात देशाचे किती हजार कोटी खर्च होणार?

India vs Bharat | एकावर्षात इंडियाची कमाई किती लाख कोटींची आहे. कमाईच्या तुलनेत नाव बदलण्यावर किती हजार कोटी खर्च होणार? नाव बदलताना खर्चाच कॅलक्युलेशन कसं आहे? राजकीय वर्तुळामध्ये चर्चेने जोर पकडला आहे.

India vs Bharat | इंडियाच भारत बनवण्यात देशाचे किती हजार कोटी खर्च होणार?
India vs Bharat
Follow us
| Updated on: Sep 06, 2023 | 1:34 PM

मुंबई : देशाच नाव काय असाव? इंडिया की, भारत? यावरुन सध्या जोरदार राजकारण सुरु आहे. इंडियाच नाव भारत करण्यावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जुंपली आहे. या वादावर अजूनपर्यंत सरकारकडून कोणतही अधिकृत वक्तव्य आलेलं नाहीय. विविध अंदाज वर्तवले जातायत. संसदेच विशेष अधिवेशन बोलवलय, त्यात इंडिया नाव हटवून फक्त भारत नाव ठेवण्यात येईल, असं बोलल जातय. त्या संदर्भात विधेयक आणलं जाऊ शकतं. जेव्हा अशा बातम्या पसरतात, त्यावेळी देशात दुसऱ्या बातम्या सुद्धा पसरतात. इंडियाच नाव भारत करण्यामध्ये सरकारची 14 हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम खर्च होऊ शकते. ही बातमी कुठून आली? गणित काय आहे? ते समजून घ्या.

आऊटलुक इंडिया आणि ईटी रिपोर्ट्नुसार देशाच इंडिया हे नाव बदलून भारत करण्यामध्ये सरकारला अंदाजित 14304 कोटी रुपये खर्च येऊ शकतो. दक्षिण आफ्रिकेचा वकील डेरेन ऑलिवियरने हे कॅलक्युलेशन केलं आहे. त्यांनीच याचा पूर्ण फॉर्म्युला बनवलाय. 2018 मध्ये स्वॅजीलँडच नाव बदलून इस्वातीनी झालं. त्यावेळी ऑलिवियर यांनी देशाच नाव बदलण्यासाठी होणाऱ्या खर्चाच कॅलक्युलेशन केलं. त्याचा फॉर्म्युला बनवला.

काय आहे कॅलक्युलेशन?

त्यावेळी डेरेन ऑलिवियर यांनी स्वॅजीलँडच नाव बदलण्याच्या प्रोसेसची तुलना मोठ्या कॉर्पोरेट रीब्रांडिंग बरोबर केली होती. ऑलिवियर यांच्यामते मोठ्या कॉर्पोरेटच एव्हरेज मार्केटिंग कॉस्ट त्याच्या एकूण रेवेन्युच्या जवळपास 6 टक्के असते. रीब्रँडिंगमध्ये कंपनीच्या एकूण मार्केटिंग बजेटच 10 टक्के रक्कम खर्च होऊ शकते. फॉर्म्युल्यानुसार, स्वॅजीलँडच नाव इस्वातीनी करण्यामध्ये 60 मिलियन डॉलर खर्च होऊ शकतो, असा ऑलिवियर यांचा अंदाज होता. आता हात फॉर्म्युला आशियातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था भारतावर लागू केल्यास, वित्त वर्ष 2023 मध्ये देशाचा एकूण रेवेन्यू 23.84 लाख कोटी रुपये आहे. याट टॅक्स आणि नॉन टॅक्स दोन्ही रेवेन्यूचा समावेश आहे.

काय आहे नाव बदलण्याचा इतिहास?

याआधी सुद्धा देशाच नाव बदलण्याचा विचार झाला आहे. 1972 साली श्रीलंकेच नाव बदलण्याची प्रोसेस सुरु झाली. 40 वर्षात सीलोन हे नाव पूर्णपणे हटवण्यात आलं. 2018 मध्ये स्वॅजीलँडच नाव बदलून इस्वातीनी करण्यात आलं आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.