देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन आजपासून….काय, काय आहेत वैशिष्ट्ये?
First Hydrogen Train Tria: 'हायड्रोजन फॉर हेरिटेज' प्रकल्पांतर्गत 35 हायड्रोजन गाड्या चालवण्याची योजना रेल्वेची आहे. त्यासाठी 2800 कोटी रुपयांच्या बजेटची तरतूद करण्यात आली आहे. तसेच हायड्रोजन ट्रेनशी संबंधित पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 600 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

First Hydrogen Train Tria: भारतीय रेल्वेच्या इतिहासात आज महत्वाचा टप्पा पूर्ण होत आहे. देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनची चाचणी आजपासून सुरु होत आहे. पर्यावरणपूरक असलेली ही ट्रेन चेन्नईमधील इंटीग्रल कोच फॅक्ट्रीत (ICF) तयार करण्यात आली आहे. या ट्रेनच्या 89 किलोमीटर मार्गावरील चाचणी ३१ मार्चपासून सुरु होत आहे. यशस्वी चाचणीनंतर ट्रेन नियमित कार्यान्वित करण्याची योजना आहे. भारतीय रेल्वेच्या ‘हायड्रोजन फॉर हेरिटेज’ या विशेष प्रकल्पांतर्गत हरित वाहतुकीच्या दिशेने ही ट्रेन एक मोठे पाऊल आहे. या ट्रेनची वैशिष्ट्ये आहेत पाहू या…
हायड्रोजन ट्रेन ही हायड्रोजन इंधन तंत्रज्ञानावर आधारित ट्रेन आहे. ही ट्रेन पारंपारिक डिझेल गाड्यांना इको-फ्रेंडली पर्याय आहे. हायड्रोजन वायूचा वापर या ट्रेनमध्ये इंधन म्हणून करण्यात आला आहे. हायड्रोजन गॅस ऑक्सिजनसोबत मिळून वीज निर्माण करते. या प्रक्रियेत हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या प्रक्रियेतून वीज निर्माण केली जाते. या वीजने ट्रेनची इलेक्ट्रिक मोटर चालवली जाते. हायड्रोजन ट्रेन डिझेल गाड्यांपेक्षा अधिक ऊर्जा-कार्यक्षम मानल्या जातात.




हायड्रोजन ट्रेनचे वैशिष्ट्ये काय?
- हायड्रोजन पर्यावरणासाठी अनुकूल आहे. कारण त्यामुळे कार्बन डायऑक्साइड किंवा इतर हानिकारक वायू उत्सर्जित करत नाहीत. त्यांचे एकमेव उत्सर्जन पाणी आहे.
- ट्रेन 1200 हॉर्स पॉवरच्या इंजिनामुळे ताशी 110 किलोमीटर वेगाने धावण्यास सक्षम आहे. ते एका वेळी 2638 प्रवासी वाहून नेऊ शकते. त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक शक्य होणार आहे.
- 8 कोच असलेली ही हायड्रोजन ट्रेन जगातील सर्वात लांब हायड्रोजन ट्रेनपैकी एक आहे. हे लांब पल्ल्याच्या मार्गांवर विशेषतः हेरिटेज आणि डोंगराळ मार्गांवर सहज धावू शकते.
- हायड्रोजन इंधन सेल तंत्रज्ञान डिझेल इंजिनपेक्षा अधिक ऊर्जा-कार्यक्षम आहे. ही ट्रेन कमी इंधनात जास्त अंतर कापू शकते. ज्यामुळे खर्च कमी होतो.
- हायड्रोजन ट्रेन डिझेल गाड्यांपेक्षा खूपच कमी आवाज करतात. ज्यामुळे प्रवाशांना शांत आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
‘हायड्रोजन फॉर हेरिटेज’ प्रकल्पांतर्गत 35 हायड्रोजन गाड्या चालवण्याची योजना रेल्वेची आहे. त्यासाठी 2800 कोटी रुपयांच्या बजेटची तरतूद करण्यात आली आहे. तसेच हायड्रोजन ट्रेनशी संबंधित पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 600 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.