India-China Relations : ‘या’ देशांना सोबत घेऊन भारताची चीनला चक्रव्युहात अडकवण्याची चाल
सीमेवर दादागिरी करणाऱ्या चीनला त्याच भाषेत धडा शिकवण्यासाठी भारताने नवीन चाल रचली आहे. भारतापासून त्याचे मित्र तोडणाऱ्या चीनला चक्रव्यूहात अडकवण्यासाठी भारताने सुद्धा तशीच रणनिती आखली आहे. फिलीपींस त्याच ताज उद्हारण आहे.
चीनला घेरण्यासाठी भारताने चक्रव्यूह तयार केला आहे. चीनचे ज्या देशांसोबत भूमी आणि समुद्री सीमा वाद आहेत, त्यांच्यासोबत भारताने आता आपले संरक्षण आणि रणनितीक संबंध दृढ करण्यावर भर दिला आहे. फिलीपींस त्याच ताज उद्हारण आहे. चीन आणि फिलीपींसच्या कोस्ट गार्डमध्ये झडप झाली. त्यानंतर 72 तासांच्या आत भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी मनालीमध्ये फिलीपींसचे राष्ट्रपती, परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्र्यांची भेट घेतली. भारत फिलीपींसच्या संप्रभुतेसोबत उभा आहे, असं भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणाले. परराष्ट्र मंत्री जयशंकर फिलीपींसमध्ये होते, त्यावेळी भारतीय कोस्ट गार्डची शिप फिलीपींसमध्ये होती.
भारताने दक्षिण चीन समुद्र आणि हिंद प्रशांत महासागरातील देशांसोबत रणनितीक सहकार्य वाढवल आहे. जापानसोबत क्वाड आणि दुसऱ्या मंचावर हे देश एकत्र आहोत. तैवानसोबतही भारताने मागच्या काही महिन्यात संबंध सुधारणेवर भर दिला आहे. भारताने वन चायना पॉलिसी फेटाळून लावत तैवानसोबत नव्याने संबंध विकसित करण्यावर भर दिलाय. तैवानची सर्वात मोठी कंपनी फॉक्सकॉनच्या प्रमुखाला पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
या देशात बनवला नौदल आणि एअर बेस
भारताने तैवानसोबत अनेक नवीन कॉन्ट्रॅक्ट केले आहेत. सेमीकंडक्टर उत्पादन क्षेत्रात तैवानसोबत मिळून मोठ्या प्रमाणात काम केलं जातय. मालदीवमध्ये चीनने घुसखोरी केल्यानंतर भारताने मॉरीशेसमध्ये आपला नौदल आणि एअर बेस बनवायला सुरुवात केली आहे. त्याशिवाय थायलंड, मलेशिया, सिंगापूर आणि दुसऱ्या आसियान देशांसोबत मिळून भारत एक रक्षा कवच बनवण्याचा प्रयत्न करत आहे. श्रीलंका, भूतान, बांग्लादेश आणि नेपाळमध्ये भारताने नव्या पद्धतीने स्ट्रेटेजी बनवायला सुरुवात केली आहे.