मोदींच्या मन की बातमधली केसरची शेती कशी देते लाखो कमाईची संधी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’मध्ये काश्मिरी केसरची निर्यात वाढेल आणि त्यामुळे ‘आत्मनिर्भर भारत’ बनवण्याच्या प्रयत्नांना अधिक बळकटी मिळेल असं मत व्यक्त केलं.

मोदींच्या मन की बातमधली केसरची शेती कशी देते लाखो कमाईची संधी?
Follow us
| Updated on: Dec 27, 2020 | 5:56 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’मध्ये काश्मिरी केसरची निर्यात वाढेल आणि त्यामुळे ‘आत्मनिर्भर भारत’ बनवण्याच्या प्रयत्नांना अधिक बळकटी मिळेल असं मत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी मे महिन्यात काश्मिरी केसरला भौगोलिक ओळख ठरणारं जीआय टॅग मिळाल्याचं सांगत यामुळे निर्यात वाढण्यास मदत होईल, असंही मोदींनी नमूद केलं. तसेच जागतिक बाजारात केसरला प्रतिकिलो 3 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंत दर असल्याचंही त्यांनी नमूद करत केसर शेतीला प्रोत्साहन दिलं (India is the 2nd largest producer of saffron Kesar in the world why saffron is so expensive).

नरेंद्र मोदी म्हणाले, “काश्मिरमधील केसर खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे केसर इतर देशांमधील केसरपेक्षा खूप वेगळे आहे. काश्मिरी केसरला जीआय टॅग मिळाल्याने त्याची वेगळी ओळख निर्माण झालीय. यामुळे आता आपण काश्मिरी केसरला जागतिक स्तरावरील लोकप्रिय ब्रँड करायला हवं.” जगभरात केसरची किंमत त्या केसरच्या गुणवत्तेवर ठरत असते.

काश्मिरी केसरला प्रति किलो 3 लाखापासून ते 5 लाख रुपयांपर्यंत दर

जागतिक बाजारपेठेत काश्मिरी केसरला प्रति किलो 3 लाखापासून ते 5 लाख रुपयांपर्यंत दर मिळतात. केसरच्या झाडाला ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात फुलं येण्यास सुरुवात होते. नोव्हेंबरमध्ये हे केसर पूर्णपणे तयार होतं. यंदा देखील नोव्हेंबर महिन्यापासून शेतकरी केसरची विक्री करत आहेत. यासाठी त्यांना ऑनलाईन बाजाराचाही उपयोग करता येणार आहे.

हेक्टरी केसरच्या शेतीत शेतकऱ्याला वर्षाला 24-27 लाख रुपये उत्पन्न

केसरची शेती आता आगामी काळात काश्मिर खोऱ्यातील शेतकऱ्यांचं नशिब बदलणार आहे. कारण मोदी सरकार (Modi Government) केसरचं (Kesar) उत्पन्न वाढवण्यावर भर देत आहे. त्यामुळे खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात चांगलीच वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारने केशरच्या उत्पान्नात आगामी काळात दुपटीने वाढ करण्याचं ध्येय ठरवलं आहे. कृषी तज्ज्ञांनुसार, एका हेक्टरमध्ये केसरची शेती केल्यास शेतकऱ्याला वर्षाला 24-27 लाख रुपये उत्पन्न मिळू शकते.

केसरच्या दरात प्रति किलो 1 लाख रुपयांची वाढ होण्याची शक्यता

सरकारने जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये स्पायसेज बोर्डाने केसर उत्पादन आणि निर्यात विकास संस्थेची (एसपीयडीए) स्थापन करण्याची तयारी केलीय. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या केसरला प्रति किलो 1 लाख रुपये दर वाढवून देण्याबाबतही विचार करत आहे. त्यामुळे केसरचे दर वाढून 3 लाख रुपयांपर्यंत जातील. यात शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होणार आहे.

केसरची किंमत महाग असल्याने त्याला लाल सोनंही म्हटलं जातं. आता हेच लाल सोनं उत्पादन घेणाऱ्या जम्मू-काश्मिरमधील किश्तवार, बडगाव, श्रीनगर आणि पंपोर येथील शेतकऱ्यांचं नशीब उजळणार असल्याचं दिसतंय. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमधील काही भागातही केसरची शेती करणं सुरु झालं आहे.

हेही वाचा :

शोपियां बनावट चकमकप्रकरणी आरोपपत्र दाखल, 3 आरोपींमध्ये सैन्यातील कॅप्टनचाही समावेश

जम्मू-काश्मीर : लष्कराच्या तळाची बॅरेक कोसळली; दोन जवान शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 लागू होईपर्यंत निवडणूक लढणार नाही; महबूबा मुफ्तींची भीष्म प्रतिज्ञा

India is the 2nd largest producer of saffron Kesar in the world why saffron is so expensive

महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.