India maldive row : भारत मालदीव यांच्यात तणाव कायम असतानाच आली एक महत्त्वाची बातमी

India maldive row : भारत आणि मालदीव या दोन्ही देशांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये संबंध बिघडले आहेत. याला जबाबदार आहे ते मालदीवमध्ये आलेले नवीन सरकार. मालदीवचे नवे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू हे सत्तेत आल्यानंतर दोन्ही देशांमध्ये कटुता वाढली आहे. पण असं असलं तरी भारताने आतापर्यंत सांमजस्याची भूमिका घेतली आहे.

India maldive row : भारत मालदीव यांच्यात तणाव कायम असतानाच आली एक महत्त्वाची बातमी
Follow us
| Updated on: Feb 23, 2024 | 9:05 PM

India maldive row : भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध अजूनही तणावापूर्ण आहेत. मालदीवमध्ये मुइज्जू यांचे सरकार आल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. कारण राष्ट्राध्यक्ष मुइज्जू हे चीन समर्थक मानले जातात. त्यामुळेच सरकार स्थापन झाल्यानंतर ते थेट चीनच्या दौऱ्यावर गेले. याआधी कोणतंही सरकार आले की, मालदीवचे राष्ट्राध्यक्ष आधी भारत दौऱ्यावर येत असे. पण मुइज्जू यांनी चीनकडून अधिक मदतीची अपेक्षा आहे. चीन मात्र त्याचा गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने त्यांना मदत तर करत आहे. पण त्यांना कधी तो गुलाम बनवेल हे त्यांच्या अजून लक्षात आलेले नाही. कारण चीनने अशाप्रकारे इतर देशांना देखील कर्जाच्या ओझ्याखाली दाबले आहे.

मालदीवविरोधात भारतीयांमध्ये संताप

पंतप्रधान मोदी यांच्या ट्विटवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मालदीवच्या तीन मंत्र्यांना पदावरुन हटवण्यात आले होते. त्यानंतर भारतीय लोकांनी मालदीवविरोधात जोरदार मोहिम चालवली होती. त्यामुळेच याचा फटका मालदीवला बसला. मालदीवला जाणारे सर्वाधिक पर्यटक भारतीय होते. पण या घटनेनंतर भारतीय पर्यटकांच्या संख्या पाचव्या स्थानावर गेली आहे.

तीन देशांचा एकत्र सराव

दोन्ही देशांमध्ये तणाव कायम असताना भारतीय तटरक्षक दल, मालदीव आणि श्रीलंकेचे कर्मचारी सागरी सुरक्षा आणि आंतरकार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि हिंदी महासागर क्षेत्रातील उदयोन्मुख आव्हाने ओळखण्यासाठी चार दिवसीय त्रिपक्षीय सराव करत आहेत. भारतीय तटरक्षक जहाज, ICGS अभिनव आणि श्रीलंकन ​​नौदलाचे जहाज सरावासाठी येथे दाखल झाले. 22 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान तीनही देशांच्या जवानांमध्ये हा सराव चालणार आहे. तर बांगलादेश या सरावात निरीक्षक म्हणून सहभागी झाला आहे. तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर ICGS डॉर्नियर देखील या सरावात भाग घेत आहेत.

काय आहे याचा उद्देश

भारत, श्रीलंका आणि मालदीव या तीनही देशाच्या तटरक्षक दलांमध्ये सहकार्य वाढवणे, मैत्री मजबूत करणे, ऑपरेशनल क्षमता सुधारणे आणि परस्पर संबंध विकसित करणे यासाठी हा एकत्र सराव केला जात आहे. मालदीव राष्ट्रीय संरक्षण दलाने (MNDF) गुरुवारी संध्याकाळी भारतीय तटरक्षक दलाचे अतिरिक्त महासंचालक एस. परमेश यांचे हार्दिक स्वागत केले.

दोन्ही जहाजांच्या कमांडिंग अधिकाऱ्यांनी कमांडंट MNDF CG यांची भेट घेतली आणि सहकार्य संबंधांच्या मार्गांवर चर्चा केली. ICG जहाजे अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होतील आणि श्रीलंका तटरक्षक दल आणि मालदीवचे राष्ट्रीय संरक्षण दल संयुक्त सागरी सरावात सहभागी होणार आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.