India maldive row : चीनची चाल पडली उलटी, भारताचा मालदीवला ही सर्वात मोठा झटका
India maldive row : मालदीव भारत विरोधी भूमिका घेत असतानाच भारताने देखील आता मालदीवला धक्का देण्याची तयारी केली आहे. चीन आणि मालदीवच्या योजनेला भारताने सुरुंग लावला आहे. भारताचा हा निर्णय तेव्हा झाला आहे मालदीवने भारतीय जवानांना माघारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
India Maldive Row : भारत आणि मालदीव यांच्यातील तणाव कायम आहे. मालदीवरमध्ये नवीन सरकार आल्यापासून दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. कारण मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू हे चीन समर्थक मानले जातात. चीनचा पाठिंबा मिळाल्याने ते सतत भारतविरोधी भूमिका घेत आहेत. मालदीवमधील भारतीय जवानांना माघारी बोलवण्याची सूचना केल्यानंतर १० मे पर्यंत यासाठी वेळ देण्यात आला आहे. दुसरीकडे मालदीवने काही भारतीय लोकांना देखील देशातून बाहेर काढण्याच्या निर्णय घेतला आहे.
चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवता येणार
मालदीव हा देश हिंद महासागरातला महत्त्वाचा देश मानला जातो. त्याला भौगोलिकदृष्ट्या महत्त्व आहे. हिंद महासागरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी हा देश खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे भारत त्याला अधिक महत्त्व देत आहे. पण आता भारताने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर लक्षद्वीपचे महत्त्व वाढले आहे. पर्यटक आता लक्षद्वीपला जाण्याचा विचार करु लागले आहेत. त्यातच बजेटमध्ये ही मालदीवला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे.
दुसरीकडे भारत सरकारने आगती आणि मिनिकॉय बेटांवर नौदल तळ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. आयएनएस जटायू असं नौदल तळ मिनिकॉय येथे बांधला जात आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 4 किंवा 5 मार्च रोजी त्यांचं उद्घाटन करू शकतात.
एअरस्ट्रिप आणखी अपग्रेड करणार
मिनीकोयमध्ये बनवण्यात येत असलेले INS जटायू नौदल तळापासून मालदीव केवळ 524 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे मालदीवची गरज कमी होणार आहे. भारत आगती बेटावरील एअरस्ट्रिप देखील आता अपग्रेड करणार आहे. त्याचा वापर लढाऊ विमाने आणि अवजड विमाने चालवण्यासाठी करता येईल. तसेच मालदीव आणि चीनच्या हालचालींवर थेट नजर ठेवता येणार आहे.
या नौदल तळावर आयएनएस विक्रमादित्य आणि आयएनएस विक्रांत तैनात केले जाऊ शकतात. लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेट हे नऊ अंश वाहिनीवर आहेत. जिथून दरवर्षी लाखो डॉलर्सचा व्यवसाय होतो. हा उत्तर आशिया आणि दक्षिण-पूर्व आशिया दरम्यानचा मार्ग आहे.
भारतीय नौदल दाखवणार आपली ताकद
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जेव्हा याच्या उद्घाटनाला येतील तेव्हा भारतीय नौदल आपली ताकद दाखवणार आहे. आयएनएस विक्रमादित्य किंवा विक्रांत सोबत आणखी सात युद्धनौका देखील येथे येऊ शकतात. नौदलाचा हा ताफा पाहून चीनला देखील हादरा बसणार आहे. मालदीव आणि चीनसारख्या देशांना भारताचा हा कडक इशारा असणार आहे.
भारत सरकारने मिनिकॉय येथे हवाई पट्टी बांधण्याचा निर्णयही घेतला आहे. आगती बेटाची हवाई पट्टी अपग्रेड केली जात आहे. जेणेकरून भारतीय सैन्याला हिंद आणि अरबी महासागरात शांतता प्रस्थापित करता येईल. याशिवाय इंडो-पॅसिफिक क्षेत्रात सागरी सुरक्षा राखता येईल.
मिनिकॉयमध्ये तयार होत असलेल्या नौदल तळामुळे चिनी नौदलाच्या हालचाली संपुष्टात येतील. याशिवाय ज्यांना सुंदा आणि लोंबक खाडीच्या दिशेने जायचे असेल तर त्याला दहा डिग्री चॅनेल म्हणजेच अंदमान आणि निकोबार बेटांवरून जावे लागेल. अशा स्थितीत दोन्ही ठिकाणी मजबूत सुरक्षा आणि पाळत ठेवणारी पथके तैनात केली जाणार आहेत. गरज पडल्यास शत्रूला चोख प्रत्युत्तर ही देता येणार आहे.