India maldive row : भारताने शोधला मालदीवचा पर्याय, आता या देशाला करणार जवळ

India maldive row : भारत आणि मालदीव या दोन्ही देशांमधील संबंध बिघडले असताना भारताने आता मालदीवला पर्याय देश शोधला आहे. भारतासोबत पंगा घेणाऱ्या मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना आता धडा शिकवला जाणार आहे. कोणता आहे तो हिंदी महासागरातील देश जाणून घ्या.

India maldive row : भारताने शोधला मालदीवचा पर्याय, आता या देशाला करणार जवळ
Follow us
| Updated on: Mar 01, 2024 | 4:06 PM

India maldive row : भारत आणि मालदीव या दोन देशांमध्ये तणाव कायम आहे. मालदीवचे नवे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू चीनला खूश करण्यासाठी भारतविरोधी भूमिका घेत आहेत. भारतासोबतचा करार त्यांनी रद्द करत भारताऐवजी त्यांनी आधी चीनला भेट दिली आहे. आता ते चीनच्या बाजुने वळले आहेत. मालदीवला भारतापासून वेगळं करणं हा चीनचा मनसुबा होता. भारतासोबत पंगा घेणं मालदीवच्या अध्यक्षांना भविष्यात महागात तर पडणारच आहे. अशा परिस्थितीत भारताला हिंद महासागरात मालदीवचा पर्याय सापडला आहे.

मालदीवला शिवकणार धडा

इंडो-पॅसिफिकमध्ये चीनचा प्रभाव रोखण्यासाठी भारतासोबत हा देश आता धोरणात्मक भागीदारी करणार आहे. भारत आता या देशासोबत काम करून मालदीवला चांगला धडा शिकवणार आहे. भारताने आता मॉरिशस सोबत भागीदार करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदी महासागरातील स्थानामुळे मॉरिशस हा भारतासाठी नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे. भारत सरकारने देखील याआधी मॉरिशसला नेहमी मदत केली आहे.

भारत आणि मॉरिशसमधील मजबूत संबंध

भारत आणि मॉरिशस या दोन्ही देशांमधील संबंध स्वातंत्र्यापूर्वीपासून आहेत. दोन्ही देशांमधील संबंध ऐतिहासिक आहेत. ऑक्टोबर 1901 मध्ये महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेच्या भेटीदरम्यान मॉरिशसमध्ये काही काळ थांबले होते. मॉरिशसचा राष्ट्रीय दिन 12 मार्च रोजी गांधींच्या दांडी सॉल्ट मार्चच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. मॉरिशसमध्ये भारतीय वंशाची लोकसंख्या अंदाजे 70 टक्के आहे. मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. मे 2019 मध्ये पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांनीही हजेरी लावली होती.

मालदीवला भारताने शोधला पर्याय

सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंधांमुळे भारत मॉरिशसला खूप महत्त्व देतो. फेब्रुवारी 2021 मध्ये भारत आणि मॉरिशस या दोन्ही देशांमध्ये  सागरी क्षेत्र जागरूकता आणि सुरक्षिततेवर करार केला. भारताने मॉरिशसला एक डॉर्नियर विमान आणि प्रगत हलके हेलिकॉप्टर ध्रुव भाडेतत्त्वावर देऊ केले होते. परंतु, भारताचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी चीनविरुद्ध द्विपक्षीय संबंधांचा फायदा घेण्याचा विचार करताना भारताने मालदीवला प्राधान्य दिले. भारताने मालदीवमध्ये आपली उपस्थिती वाढवली, जो नंतर चीनच्या चालीचा बळी ठरला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.