India Maldive Row : भारतासोबत पंगा घेताच सुरु झाले उलटे दिवस, मालदीवला पहिला मोठा झटका
India Maldive Row : भारतासोबत पंगा घेणाऱ्या मालदीवचे उलटे दिवस सुरु झाले आहे. अनेक गोष्टींवर भारताच्या मदतीवर अवलंबून असलेल्या मालदीवला आता आणखी एक धक्का बसला आहे. मालदीववर दुसऱ्यांपुढे हात पसरावे लागले आहे. भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या मुईज्जू यांच्या अडचणी वाढणार आहेत.
India maldive Row : भारत आणि मालदीव यांच्यातील तणाव अजून संपलेला नाही. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी थेट भारताशी पंगा घेतला आहे. सत्तेत येण्यापूर्वीच त्यांनी ‘इंडिया आऊट’ मोहीम सुरु केली. ज्याअंतर्गत त्यांनी सत्तेत येताच भारतीय सैनिकांना देशातून माघारी पाठवण्याचा निर्णय घेतला. यासाठी 10 मे पर्यंतची मुदत ठरलीये. आता भारतीय सैनिक मालदीव सोडणार आहेत आणि त्यांच्या जागी भारतातील तांत्रिक कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप भेट दिल्यानंतर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी पीएम मोदी आणि भारतीयांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर तिन्ही मंत्र्यांची हकालपट्टी करावी लागली होती. पण तरी देखील मुइज्जू यांची भारत विरोधी भूमिका सुरुच आहे. कारण यादरम्यान त्यांनी चीनचा दौरा केला होता. चीनकडून अभय मिळाल्यानंतर त्यांनी सतत भारतविरोधी वक्तव्य करणे सुरु ठेवले आहे.
भारतासोबत पंगा घेणं पडणार महागात
भारतासोबत पंगा घेणं मालदीवला चांगलेच महागात पडत आहे. एका अहवालानुसार मालदीवचे दिवाळे निघाले आहे. मालदीवने आपली परिस्थिती सांगताना IMF (आंतरराष्ट्रीय नाणेनिधी – IMF) ला दिवाळखोरीबद्दल माहिती दिली आहे. दिवाळखोरीनंतर मालदीवने आता IMF कडे कर्जमाफीची मागणी केली आहे.
भारतासोबत पंगा घेतल्यानंतर भारताने मालदीवच्या मदतनिधीत देखील कपात केली आहे. भारतीय पर्यटकांची संख्या ही कमी झाली आहे. पर्यटनावरच मालदीवरची अर्थव्यवस्था टिकून आहे. पण सर्वाधिक संख्या असलेल्या भारतीयांनीच मालदीववर बहिष्कार टाकला आहे.त्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेला आणखी धक्का बसला आहे.
भारताशी पंगा घेणे महागात पडले
भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध काही काळाआधी चांगले होते. पण चीन समर्थक मुइज्जू मालदीवचे अध्यक्ष झाल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. मुइज्जू हे सुरुवातीपासूनच भारतविरोधी आहेत. पीएम मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवच्या मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे भारतीयांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यानंतर भारतीयांनी मालदीवला विरोध करण्यास सुरुवात केली.
BIG BREAKING- Maldives has declared bankruptcy with IMF and has reportedly asked for a bailout.
— Frontalforce 🇮🇳 (@FrontalForce) February 16, 2024
बडे सेलिब्रिटी आणि अनेकांनी मालदीवचा दौरा रद्द केला. भारतातील अनेक प्रवासी कंपन्यांनी मालदीवमधील फ्लाइटपासून हॉटेलपर्यंतचे बुकिंग रद्द करण्यास सुरुवात केली. त्यामुळे मालदीवच्या पर्यटनाला मोठा धक्का बसला आहे. गेल्या वर्षी मालदीवला जाणाऱ्या प्रवाशांमध्ये भारतीय अग्रस्थानी होते, मात्र आता भारत या बाबतीत पाचव्या स्थानावर आला आहे.
आपल्याच पायावर कुऱ्हाड
भारत केवळ पर्यटनच नाही तर वैद्यकीय, शिक्षण आणि इतर अनेक आवश्यक गोष्टींसाठी देखील मालदीवला मदत करत होता.मालदीव मधील लोकं उपचारासाठी भारतात येत होती. पण आता परिस्थिती अशी झाली आहे की मालदीवला आपत्कालीन वैद्यकीय बाबतीत श्रीलंकेची मदत घ्यावी लागली आहे.
चीन मालदीवला मदत करत असला तरी त्यामागचा त्याचा हेतू वेगळा आहे. जो मालदीवला अजून कळालेला नाही. त्यामुळे भारतासोबत पंगा घेऊन त्यांनी आपल्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली आहे.