मालदीवची पोल उघडली, भारतीय सैनिक परततात अडचणी सुरु, देशात विमानांसाठी पायलटच नाही

India Maldives Tension:चीन समर्थक म्हणून विद्यामान राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू ओळखले जातात. त्यांनी मालदीवमधील तीन विमानासाठी असणाऱ्या भारतीय लष्करी कर्मचाऱ्यांना 10 मे पर्यंत परत पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध तणावाखाली आले. भारताने यापूर्वीच ७६ लष्करी जवानांना परत बोलावले आहे.

मालदीवची पोल उघडली, भारतीय सैनिक परततात अडचणी सुरु, देशात विमानांसाठी पायलटच नाही
Follow us
| Updated on: May 13, 2024 | 5:09 PM

India Maldives Tension: मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनी भारताशी पंगा घेतला. मालदीवमध्ये असणाऱ्या 76 भारतीय सैनिकांना परत जाण्याचे सांगितले. भारतीय सैनिक मालदीवमधून परत येताच त्यांची पोल उघडली आहे. मालदीव अडचणीत आल्याचे संरक्षणमंत्र्यांनी मान्य केले आहे. मालदीवचे संरक्षणमंत्री घासन मौमून यांनी भारताकडून मिळालेले तीन विमानांचे उड्डाण करण्यासाठी सक्षम पायलट नसल्याचे म्हटले आहे. मालदीवच्या पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.

मालदीवकडून सरळ कबुली

घसान यांनी राष्ट्रपती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सरळ सरळ कबुली देऊन टाकली. त्यांनी सांगितले की, मालदीवमध्ये दोन हेलिकॉप्टर आणि एक डॉर्नियर विमान चालवण्यासाठी भारतीय सैनिक होते. परंतु भारतीय सैनिकांना परत पाठवण्यात आले. त्यांच्या जागी भारतातील असैनिक आले. परंतु मालदीव राष्ट्रीय संरक्षण दल (MNDF) कडे भारतीय लष्कराने दिलेली तीन विमाने चालवू शकतील असा एकही कर्मचारी नाही. मात्र, काही सैनिकांना आधीच्या सरकारांशी झालेल्या करारांतर्गत उड्डाणाचे प्रशिक्षण देण्यात आले.

विमाने चालवण्याचे प्रशिक्षणात विविध टप्पे पार करावे लागतात, परंतु आमच्या सैनिकांना विविध कारणांमुळे ते पूर्ण करता आले नाही. त्यामुळे, सध्या आपल्या सशस्त्र दलात अशी कोणतीही व्यक्ती नाही जिच्याकडे दोन हेलिकॉप्टर आणि डॉर्नियर उडवण्याचा परवाना किंवा कसून उड्डाणाचे प्रशिक्षण आहे, असे घासन यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

का उचलले मालदीवने हे पाऊल

चीन समर्थक म्हणून विद्यामान राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू ओळखले जातात. त्यांनी मालदीवमधील तीन विमानासाठी असणाऱ्या भारतीय लष्करी कर्मचाऱ्यांना 10 मे पर्यंत परत पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध तणावाखाली आले. भारताने यापूर्वीच ७६ लष्करी जवानांना परत बोलावले आहे. मात्र, मालदीव सरकारचा त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या डॉक्टरांना हटवण्याचा कोणताही विचार नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत पहिल्या चार महिन्यांत भारतातून मालदीवमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत 42 टक्क्यांनी घट झाली आहे. भारतीय पर्यटकांनी टाकलेल्या बहिष्काराचा परिणाम मालदीववर झाला आहे.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.