IND vs Pak : भारत-पाकिस्तान सामन्याची शेवटची ओव्हर पाहताना तरुण झाला हायपर, अचानक कोसळला अन् जीव…

पाकिस्तान विरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात टीम इंडिया जिंकली, पण 34 वर्षीय तरुण आयुष्य हरला!

IND vs Pak : भारत-पाकिस्तान सामन्याची शेवटची ओव्हर पाहताना तरुण झाला हायपर, अचानक कोसळला अन् जीव...
बापरे! लास्ट ओव्हर पाहताना तरुणाचा मृत्यूImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 26, 2022 | 1:12 PM

आसाम : रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs Pak T20 Match) सामना झाला. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर अखेरच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर विजय मिळवला. रोमहर्षक सामन्यातील थरार काळजाचा ठोका चुकवणारा असाच होता. दरम्यान, याच सामन्यातील शेवटची ओव्हर (Ind Vs Pak T20 Last Over) पाहाताना आसामच्या गुवाहाटीमध्ये एका 34 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. या तरुणाच्या मृत्यूचं कारण कार्डियाक अरेस्ट (Cardiac Arrest) असल्याची माहिती समोर आली आहे. मॅच पाहताना झालेल्या तरुणाच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जातेय.

टी-20 वर्ल्ड कप 2022मधील भारताची पहिली मॅच पाकिस्तानच्या विरुद्ध रविवारी झाली. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर झंझावाती विजय मिळवला. मात्र याच सामन्याची शेवटची ओव्हर पाहत असताना 34 वर्षांच्या बिटू गोगोई या तरुणाचा मृत्यू झाला. तो गुवाहाटीमधील एका सिनेमागृहात लाईव्ह मॅच पाहण्यासाठी गेला होता.

हे सुद्धा वाचा

क्रिकेट चाहत्यांच्या आग्रहाखातर भास्करज्योती सिनेमा गृहात भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आलं होतं. त्यासाठी अनेक क्रिकेट चाहते सिनेमागृहात आले होते. बिटू गोगोई देखील क्रिकेटचा चाहता. तो देखील मॅच पाहण्यासाठी आणि या हायव्होल्टेज सामन्याचा आनंद घेण्यासाठी सिनेमागृहात मॅच पाहायला आला होता.

दरम्यान, शेवटची ओव्हर सुरु झाली आणि बिटू गोगोई अचानक खाली कोसळला. अखेरच्या ओव्हरमध्ये मॅच जिंकल्यामुळे सिनेमागृहातील चाहत्यांनी एकच जल्लोष केला. पण बिटू गोगोईला अचानक काय झालं, तो खाली का कोसळला, हे कळेपर्यंत फार उशीर झाला होता.

विराट कोहलीने शेवटच्या ओव्हरमध्ये सिक्स मारताक्षणी बिटू खाली कोसळला होता, अशी माहिती त्याच्यासोबत आलेल्या मित्रांनी दिली. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार 10 मिनिटातच बिटू याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिथल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

मॅच पाहण्यासाठी सिनेमागृहात गेलेल्या बिटू सोबतच्या मित्रांना या घटनेनं मोठा धक्काच बसला आहे. बिटू हा सिवसागर नगर येथे राहायला होता. अखेरच्या ओव्हरमध्ये बेशुद्ध झालेला बिटूचे डोळे नंतर उघडलेच नाहीत. या घटनेमुळे आता हळहळ व्यक्त केली जातेय.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.