नवी दिल्ली : देशात गेल्या 24 तासात 11,739 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 25 रुग्णांचा मृत्यू (Death) झाला आहे. कोरोनामुळे (Corona) आतापर्यंत देशात 5,24,999 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण कोरोना रुग्णांची आकडेवारी ही 4,33,89,973 वर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोना रुग्णावाढीनं डोकं वर काढल्यानं चिंता व्यक्त केली जातेय. कालच्या तुलनेत आज कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली आहे. काल देशात 15,940 कोरोना रूग्णांची (Patients) नोंद करण्यात आली होती. तसेच 20 जणांचा मृत्यू झाला होता. त्या तुलनेत आजचा आकडा दिलासादायक आहे.
लसीकरणाची आकडेवारी पाहिली तर 197 कोटी 85 लाख 51 हजार 580 लोकांचे लसीकरण झाले आहे. गेल्या 24 तासांत 12 लाख 72 हजार 739 लोकांना लसीकरण करण्यात आले आहे. या कालावधीत 4 लाख 53 हजार 490 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र, धोकादायक बाब म्हणजे काही लोकांचे दोन्ही कोरोना डोस झाल्यानंतरही त्यांना कोरोनाची लागण झालीये. यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची अत्यंत गरज आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरायला हवे. कोरोना टाळण्यासाठी शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
गेल्या 24 तासांत भारतात 11,739 नवीन कोरोना रूग्णांची नोंद झालीये. नवीन प्रकरणांमध्ये मागील दिवसाच्या 15,940 नवीन प्रकरणांपेक्षा घट झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 92,576 आहे. मुंबईमध्ये देखील सातत्याने कोरोना रूग्णांची संख्या वाढताना दिसते आहे. मुंबईसह ठाणे जिल्हातही आकडा वाढतोय. राज्यातील सर्वाधिक कोरोना रूग्ण हे मुंबई शहरामध्ये असल्याचे आकडेवारीवरून दिसते आहे.