भारताकडून पाकिस्तानचा MFN दर्जा रद्द, MFN म्हणजे नेमकं काय?
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याची मागणी जोर धरत असल्याने, दिल्लीतील हालचाली वेगवान झाल्या आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची बैठक सकाळी पार पडली. या बैठकीनंतर अरुण जेटली यांनी माध्यमांसमोर येऊन घोषणा केली की, मोस्ट फेव्हर्ड नेशन म्हणजेच MFN दर्जा पाकिस्तानचा काढून टाकला जाईल. वाणिज्य मंत्रालय तशा […]
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याची मागणी जोर धरत असल्याने, दिल्लीतील हालचाली वेगवान झाल्या आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची बैठक सकाळी पार पडली. या बैठकीनंतर अरुण जेटली यांनी माध्यमांसमोर येऊन घोषणा केली की, मोस्ट फेव्हर्ड नेशन म्हणजेच MFN दर्जा पाकिस्तानचा काढून टाकला जाईल. वाणिज्य मंत्रालय तशा सूचना लवकरच जारी करेल. मात्र, MFN दर्जा म्हणजे नेमका काय :
मोस्ट फेव्हर्ड नेशन (MFN) दर्जा म्हणजे काय?
एखाद्या देशाशी व्यापारासंदर्भात कसा व्यवहार करायचा, कोणत्या गोष्टींचा व्यापार करायचा, त्यावर सूट किती द्यायची इत्यादी गोष्टींचा मोस्ट फेव्हर्ड नेशन दर्जात विचार केला जातो. या दर्जाच्या माध्यमातून दोन्ही देश व्यापारसाठी बाजारपेठा एकमेकांसाठी खुल्या करतात. शिवाय, दोन्ही देशातील राजनैतिक संबंध सुधारण्यासाठीही मोस्ट फेव्हर्ड नेशन दर्जाचा उपयोग होत असतो.
Pulwama Attack: माझा शब्द आहे, रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ : मोदी
हा दर्जा मिळणाऱ्या देशाला व्यापारामध्ये विशेष सवलती मिळतात. न्यूनतम निर्यात शुल्क आणि विभिन्न व्यापारी करांमध्ये सूटही दिली जाते. दोन्ही देश एकमेकांच्या बाजारपेठा व्यापारासाठी खुल्या करतात. विश्व व्यापारी संघटना आणि आंतरराष्ट्रीय ट्रेड नियमाअंतर्गत हा दर्जा दिला जातो.
भारताने पाकिस्तानला MFN दर्जा कधी दिला होता?
1 जानेवारी 1996 रोजी तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या काळात पाकिस्तानला मोस्ट फेव्हर्ड नेशनचा (MFN) दर्जा देण्यात आला. महत्वाचं म्हणजे, पाकिस्तानने कधीच भारताला मोस्ट फेव्हर्ड नेशन दर्जा दिला नाही.
MFN दर्जा रद्द केल्याने काय परिणाम होईल?
भारत पाकिस्तानला साखर, चहापत्ती, कॉटन, टायर, रबर, पेट्रोलियम ऑईल, अशा गोष्टी निर्यात करत होता, तर पोर्टलेंड सिमेंट, स्क्रॅप, फ्रेब्रिक कॉटन, अननस, कॉपर वेस्ट या गोष्टी पाकिस्तानकडून भारत आयत करत होता. या व्यापारावर परिणाम होईल. मात्र, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सध्या फारसा व्यापारी व्यवहार होत नाही. त्यामुळे सध्या फार फरक पडेल, असे दिसून येत नाही.
VIDEO : काय आहे मोस्ट फेव्हर्ड नेशन (MFN) दर्जा?