AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Cases in India | सलग दुसऱ्या दिवशी 4.1 लाखांहून अधिक नवे रुग्ण, 24 तासात 3915 कोरोनाबळी

गेल्या 24 तासात कोरोनाचे 4 लाख 14 हजार188 नवीन रुग्ण सापडले आहेत (India COVID19 cases 24 hours)

Corona Cases in India | सलग दुसऱ्या दिवशी 4.1 लाखांहून अधिक नवे रुग्ण, 24 तासात 3915 कोरोनाबळी
corona
Follow us
| Updated on: May 07, 2021 | 9:46 AM

नवी दिल्ली : देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा विस्फोट (Corona Cases in India) होताना पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे चार लाखांहून अधिक नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 3 हजार 915 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. (India reports record break 414188 new COVID19 cases in the last 24 hours)

24 तासातील आकडेवारी

सलग दुसऱ्या दिवशी 24 तासातील कोरोना रुग्णसंख्येने चार लाखांचा टप्पा ओलांडला. गेल्या 24 तासात भारतात 4 लाख 14 हजार 188 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. म्हणजेच आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात जवळपास दोन हजारांनी वाढ झाली आहे. तर 3 हजार 915 रुग्णांना प्राण गमवावे लागले. आधीच्या दिवशी भारतात एका दिवसातील सर्वाधिक कोरोनाबळींची ( 3 हजार 980) नोंद झाली होती. आजचा आकडा कमी असला, तरी त्याच्या जवळ जाणारा आहे. दिलासादायक बाब ही, की कालच्या दिवसात देशात 3 लाख 31 हजार 507 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. ही संख्याही आदल्या दिवसापेक्षा अधिक आहे.

आतापर्यंतची आकडेवारी

आतापर्यंत देशात 1 कोटी  76 लाख 12 हजार 351 रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 14 लाख 91 हजार 598 वर गेला आहे. आतापर्यंत 2 लाख 34 हजार 83 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 36 लाख 45 हजार 164 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 16 कोटी 49 लाख 73 हजार 164 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 4,14,188

देशात 24 तासात मृत्यू – 3,915

देशात 24 तासात डिस्चार्ज -3,31,507

एकूण रुग्ण – 2,14,91,598

एकूण मृत्यू – 2,34,083

एकूण डिस्चार्ज – 1,76,12,351

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 36,45,164

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 16,49,73,058

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती (India COVID19 cases 24 hours)

संबंधित बातम्या :

मुंबईत प्रत्येक विभागात ड्राईव्ह इन लसीकरण होणार, तुमच्या जवळचे केंद्र बघा

खरंच प्लाझ्मा डोनेशनमुळे कोविड बरा होतो का? जाणून घ्या प्लाझ्मा कधी आणि कसे करु शकतो दान

(India reports record break 414188 new COVID19 cases in the last 24 hours)

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.