India-Russia Deal : रशिया मैत्री निभावणार, भारताला देणारं खास हत्यार पांत्सिर, काय आहे त्यात?

What is Pantsir S1 missile gun system : रशिया हा भारताचा जुना, विश्वासू मित्र देश आहे. रशिया आता भारताला एक खास शस्त्र देणार आहे, त्याचं नाव आहे पांत्सिर. या शस्त्राच वैशिष्ट्य म्हणजे सगळचं एकामध्ये असणार. भारताला चीन आणि पाकिस्तान सारख्या धोकेबाज देशांचा शेजार लाभला आहे. त्यामुळे रशियाच हे शस्त्र गेमचेंजर ठरु शकतं.

India-Russia Deal : रशिया मैत्री निभावणार, भारताला देणारं खास हत्यार पांत्सिर, काय आहे त्यात?
Weapon
Follow us
| Updated on: Nov 12, 2024 | 1:00 PM

भारतीय एअर डिफेंस सिस्टिम आणखी मजबूत करण्यासाठी भारत डायनमिक्स लिमिटेडने (BDL) रशियासोबत डील केली आहे. ही डील एडव्हान्स पांत्सिर एअर डिफेंस मिसाइल गन सिस्टिमसाठी झाली आहे. त्यामुळे भारताची हवाई सुरक्षा अधिक बळकट होणार आहे. बीडीएलने ही डील रशियन कंपनी रोसोबोरोनएक्सपोर्ट (ROE) सोबत केली आहे. ROE ही रशियन सरकारच्या नियंत्रणाखालील शस्त्र एक्सपोर्ट करणारी कंपनी आहे. पांत्सिर एअर डिफेंस मिसाइल गन सिस्टिम कसं काम करते? किती देशांकडे आहे? त्या बद्दल जाणून घेऊया.

पांत्सिर एअर डिफेंस मिसाइल गन सिस्टिम ही पांत्सिर-एस1 सिस्टिम ही मोबाइल, शॉर्ट रेंज डिफेंस सिस्टिम आहे. यात मिसाइल आणि गन दोन्ही फिट होतात. पांत्सिर-एस1 एयर डिफेंस मिसाइल गन सिस्टिम म्हणजे परफेक्ट सुरक्षा असं रोसोबोरोनएक्सपोर्टने म्हटलय. छोट्या मिलिट्री, इंडस्ट्रियल आणि प्रशासनिक फॅसिलिटीजची हवाई हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी ही एअर डिफेन्स सिस्टिम तयार केली आहे, रोसोबोरोनएक्सपोर्टने वेबसाइटवर ही माहिती दिलीय. एयरक्राफ्ट आणि क्रूज मिसाइल सारख्या अस्त्रांपासून ही सिस्टिम सुरक्षा प्रदान करते.

सिस्टिमची खासियत काय?

पांत्सिर-एस1 सिस्टिममध्ये 12, 57 ई 6 मिसाइल्स आणि दोन 30 एमएम 2A38 एम तोपा आहेत. या सिस्टिमधल्या मिसाइलद्वारे 1200 ते 20 हजार मीटरच्या रेंजमधल्या टार्गेटला ध्वस्त करता येतं. गनद्वारे 2000 ते 4000 मीटरच्या रेंजमधील टार्गेटला लक्ष्य करता येतं. या मिसाइल्सची एल्टीट्यूड रेंज 15 ते 15 हजार मीटर आहे. या सिस्टिमधल्या गनच्या एल्टीट्यूड रेंजने 0 से 3000 मीटरपर्यंतच टारगेट एंगेज करता येतं. या सिस्टिमधली एंटी-एअरक्राफ्ट गन आणि मिसाइल्स प्रिसिजन गाइडेड एम्युनिशन आणि मानव रहीत एरियल व्हीकलला हवेतच नष्ट करतं.

पांत्सिर-एस1 सिस्टिमच सर्वात मोठं वैशिष्टय काय?

पांत्सिर-एस1 सिस्टिमच सर्वात मोठं वैशिष्टय म्हणजे ही सिस्टिम 1000 मीटर प्रति सेकंदाच्या स्पीडने मूव होते. एकाचवेळी चार टार्गेट्सना लक्ष्य करता येतं. ही एक एडव्हान्स रडार आणि ट्रँकिंग सिस्टिम आहे. 36 किमी लांब आणि 15 किमी उंचावरील टार्गेट शोधून काढते. ही सिस्टिम हाय फ्रीक्वेंसी इंगेजमेंट रडार सिस्टम ऑप्शनल थर्मल इमेजिंग सेंसरच्या माध्यमातून टार्गेट सेट करतो.

Non Stop LIVE Update
'दादांची मी माफी मागते...', जाहीरपणे पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
'दादांची मी माफी मागते...', जाहीरपणे पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?.
... तर माझ्या विजयात उद्धव ठाकरेंचा खारीचा वाटा, राणे असं का म्हणाले?
... तर माझ्या विजयात उद्धव ठाकरेंचा खारीचा वाटा, राणे असं का म्हणाले?.
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, सत्तारांच्या वक्तव्यानं चर्चा
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, सत्तारांच्या वक्तव्यानं चर्चा.
'उद्धव ठाकरेंच्या बॅगेतून दोनचं गोष्टी निघतील...'; राज ठाकरेंचा टोला
'उद्धव ठाकरेंच्या बॅगेतून दोनचं गोष्टी निघतील...'; राज ठाकरेंचा टोला.
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका.
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला.
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?.
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या....
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य.
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट.