Pakistan on Kashmir in UN : काश्मीरवर नको ते बोलणाऱ्या पाकिस्तानी PM ना भारताने संयुक्त राष्ट्रात चांगलचं धुतलं

India Slams Pakistan on Kashmir : भारताने काश्मीर मुद्यावरुन पुन्हा एकदा पाकिस्तानला आरसा दाखवला आहे. संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी काश्मीरचा विषय उचलला. याबद्दल बोलताना त्यांनी खूप हास्यास्पद वक्तव्य केली. UN मधील भारतीय डिप्लोमॅटने आपला उत्तर देण्याचा अधिकार वापरत पाकिस्तानचे आरोप किती खोट आहेत ते सिद्ध केलच. पण शहबाज शरीफ यांना त्यांच्या भाषणावरुन चांगलच धुतलं.

Pakistan on Kashmir in UN : काश्मीरवर नको ते बोलणाऱ्या पाकिस्तानी PM ना भारताने संयुक्त राष्ट्रात चांगलचं धुतलं
india slams pakistan pm shahbaz sharif on kashmir issue in unga
Follow us
| Updated on: Sep 28, 2024 | 12:03 PM

काश्मीर संदर्भात पाकिस्तानी पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी केलेल्या वक्तव्याचा भारताने चांगलाच समाचार घेतला आहे. शुक्रवारी संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा मांडला. पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी जम्मू-काश्मीरची तुलना पॅलेस्टाइनशी केली. शहबाज शरीफ यांचं हे वक्तव्य हास्यास्पद असल्याच भारताने म्हटलं आहे. भारतीय डिप्लोमॅट भाविका मंगलनंदन यांनी UNGA मध्ये उत्तर देण्याचा अधिकार वापरत पाकिस्तानी पंतप्रधानांवर टीका केली. त्यांचं भाषण हास्यास्पद असल्याच म्हटलं.

“दहशतवादाला प्रोत्साहन देणारा देश अशी पाकिस्तानची जागतिक प्रतिमा आहे. पाकिस्तान शेजाऱ्यांविरोधात दहशतवादाचा शस्त्रासारखा वापर करतो” असं भारतीय डिप्लोमॅट भाविका मंगलनंदन UNGA मध्ये पाकिस्तानला उत्तर देताना म्हणाल्या. भारतीय डिप्लोमॅटने शहबाज शरीफ यांच्या भाषणावर टीका केली. पाकिस्तान कशा प्रकारे दहशतवादाचा वापर करुन जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक प्रक्रिया बाधित करण्याचा प्रयत्न केलाय ते भारतीय डिप्लोमॅटने सांगितलं.

परिणाम भोगावे लागतील, असा इशाराच दिला

पाकिस्तानने 1971 साली नरसंहार केला. दीर्घकाळ अल-कायदा प्रमुख ओसामा बिन लादेनच आदिरातिथ्य करत होता असं भाविका मंगलनंदन म्हणाल्या. दहशतवादाबरोबर कुठलीही तडजोड होऊ शकत नाही, हे भाविका मंगलनंदन यांनी स्पष्ट केलं. भारताविरुद्ध दहशतवाद पसरवण्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराच त्यांनी दिला.

काश्मीरवर शहबाज शरीफ काय म्हणाले?

न्यू यॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या 79 व्या सत्राला पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी संबोधित केलं. त्यांनी काश्मीर मुद्दा उचलला. पॅलेस्टाइन लोकांप्रमाणे जम्मू-काश्मीरचे लोक आपलं स्वातंत्र्य आणि अधिकारांसाठी दीर्घकाळ संघर्ष करतायत. UNSC चे प्रस्ताव लागू करण्याचा आपला शब्द भारताने पाळलेला नाही असा आरोप शहबाज शरीफ यांनी केला.

पाकिस्तानी पंतप्रधानांची हास्यास्पद वक्तव्य

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याच दर्जा देणारं आर्टिकल 370 हटवण्याच्या निर्णयावरही शहबाज यांनी टीका केली. भारताने हा निर्णय मागे घ्यावा व शांततापूर्ण तोडग्यासाठी पाकिस्तानसोबत चर्चा केली पाहिजे असं शहबाज शरीफ म्हणाले. जम्मू-काश्मीरमध्ये जनमत चाचणी घ्या अशी सुद्धा त्यांनी मागणी केली. पाकिस्तानी पंतप्रधानांनी भारतावर इस्लामोफोबिया असल्याचा आरोप केला. भारतात हिंदूवादी एजेंडा हा इस्लामोफोबियाची अभिव्यक्ती आहे. याचा वापर भारतीय मुस्लिमांना लाचार करण्यासाठी केला जात आहे. भारतात इस्लामी वारसा मिटवण्याचा प्रयत्न सुरु आहे असा आरोपही त्यांनी केला.

या तिघांचं मिठंना, आमच्याकडं अजून...जागा वाटपावर काय म्हणाले जानकर?
या तिघांचं मिठंना, आमच्याकडं अजून...जागा वाटपावर काय म्हणाले जानकर?.
लाडकी बहीण योजनेवर राज यांची टीका, म्हणाले की जानेवारीत पगार द्यायला
लाडकी बहीण योजनेवर राज यांची टीका, म्हणाले की जानेवारीत पगार द्यायला.
मुंबईत हायअलर्ट, मंदिरांसह सर्व महत्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ
मुंबईत हायअलर्ट, मंदिरांसह सर्व महत्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ.
गद्दारी पचवण्याचा..... केदार दिघे धर्मवीर-2 बद्दल म्हणाले की...
गद्दारी पचवण्याचा..... केदार दिघे धर्मवीर-2 बद्दल म्हणाले की....
रेशनवर प्लास्टीक तांदुळ? खासदार प्रणिती शिंदे यांचा आरोप, काय प्रकरण?
रेशनवर प्लास्टीक तांदुळ? खासदार प्रणिती शिंदे यांचा आरोप, काय प्रकरण?.
'गिरीशभाऊ गुटखा खात नाही, दारु पित नाही, त्यांना एकच सवय..,'- नाथाभाऊ
'गिरीशभाऊ गुटखा खात नाही, दारु पित नाही, त्यांना एकच सवय..,'- नाथाभाऊ.
ही सुरुवात आहे, गुलाल उधळलाय... मोठ्या विजयानंतर काय म्हणाले आदित्य?
ही सुरुवात आहे, गुलाल उधळलाय... मोठ्या विजयानंतर काय म्हणाले आदित्य?.
आनंद दिघेंना मारलं गेलं हे अख्खा ठाणे जिल्हा जाणतो, कोणी केला आरोप ?
आनंद दिघेंना मारलं गेलं हे अख्खा ठाणे जिल्हा जाणतो, कोणी केला आरोप ?.
विद्यापीठ सिनेट निवडणूक : सर्व उमेदवार विजयी, संजय राऊत म्हणाले की....
विद्यापीठ सिनेट निवडणूक : सर्व उमेदवार विजयी, संजय राऊत म्हणाले की.....
माजी आमदार राजन पाटील यांची सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड
माजी आमदार राजन पाटील यांची सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड.