शत्रुचा कर्दनकाळ राफेल पुन्हा भारतात येणार? किती विमानं विकत घेणार? किती लाख कोटींचा करार?

Mega Rafale Fighter Jets Deal : राफेल हे भारताचं अत्याधुनिक फायटर विमान आहे. 4.5 जनरेशनची ही विमानं भारताने फ्रान्सकडून विकत घेतली आहेत. आता भारत फ्रान्सकडून आणखी अशी विमान विकत घेणार आहे. भारत सैन्य दलाच्या कुठल्या विभागासाठी? ही विमानं विकत घेणार आहे. किती लाख कोटीचा हा करार असेल?.

शत्रुचा कर्दनकाळ राफेल पुन्हा भारतात येणार? किती विमानं विकत घेणार? किती लाख कोटींचा करार?
Rafale Fighter Jets
Follow us
| Updated on: Dec 03, 2024 | 9:11 AM

अमेरिकेकडून भारताला लवकरच घातक शस्त्र मिळणार आहे. सीमेवरील दहशतवादी कारवाया लक्षात घेता हे शस्त्र गेमचेंजर ठरणार आहे. कारण शत्रुला समजण्याआधीच अचूक वार करण्याची या शस्त्राची क्षमता आहे. हे आहेत, अमेरिकेचे MQ-9B प्रीडेटर ड्रोन्स. भारताने काही महिन्यांपूर्वी अमेरिकेसोबत 31 सशस्त्र MQ-9B प्रीडेटर ड्रोन्स खरेदीचा करार केला आहे. फक्त टेहळणीच नाही, तर काही हजार फूट उंचीवरुन अचूक हवाई हल्ला करणाऱ्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज ड्रोन्स भारताला मिळणार आहेत. अफगाणिस्तान युद्धात अमेरिकेने या MQ-9B प्रीडेटर ड्रोन्सची क्षमता दाखवून दिली आहे. भारताने अमेरिकेसोबत करार केला आहेच, पण आता लवकरच फ्रान्ससोबत दोन मेगा डीलवर स्वाक्षरी होऊ शकते. भारत फ्रान्सकडून 26 राफेल मरीन फायटर जेट्स आणि तीन अतिरिक्त स्कॉर्पियन वर्गाच्या पाणबुड्या खरेदी करार करण्याच्या तयारीत आहे.

लवकरच या दोन मेगा डीलवर स्वाक्षरी होऊ शकते. भारताने इंडियन एअर फोर्ससाठी फ्रान्सकडून 36 राफेल फायटर विमाने आधीच विकत घेतली आहेत. आता 26 राफेल मरीन फायटर जेट्स भारतीय नौदलासाठी विकत घेण्यात येणार आहेत. “राफेल आणि स्कॉर्पियन पाणबुड्यांची डील अंतिम टप्प्यात आहे. पुढच्या महिन्यात त्यावर स्वाक्षरी होऊ शकते” असं नौदल प्रमुख एडमिरल दीनेश के त्रिपाठी म्हणाले. “नुकताच बॅलेस्टिक मिसाइलद्वारे अणवस्त्र हल्ला करण्यास सक्षम असलेल्या INS अरिघात पाणबुडीचा भारतीय नौदलात समावेश झाला. त्यामुळे भारताची पाण्याखालून हल्ला करण्याची क्षमता अधिक बळकट झाली” असं एडमिरल दीनेश के त्रिपाठी म्हणाले.

किती लाख कोटीचा करार?

भारताने 31 सशस्त्र MQ-9B प्रीडेटर ड्रोन्ससाठी अमेरिकेसोबत 32,350 कोटींचा करार केला आहे. आता फ्रान्सकडून 26 राफेल मरीन फायटर जेट्स आणि तीन अतिरिक्त स्कॉर्पियन वर्गाच्या पाणबुड्यांसाठी 1 लाख कोटींच्या आसपास करार होऊ शकतो. अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असलेल्या K-4 मिसाइलचा पल्ला 3500 किमी असल्याची दीनेश के त्रिपाठी यांनी पृष्टी केली. “K-4 मिसाइलची चाचणी यशस्वी ठरली. संरक्षण संस्था चाचणीच्या अन्य निकषांची पडताळणी करत आहेत. लवकरच रिझल्ट समजेल” असं दीनेश के त्रिपाठी म्हणाले. अण्वस्त्र हल्ला करण्यास सक्षम असलेली दुसरी पाणबुडी INS अरिहंत K-15 मिसाइलने सुसज्ज आहे. या मिसाइलची रेंज 750 किलोमीटर पर्यंत आहे. अणवस्त्र हल्ला करण्यास सक्षम असलेली याच वर्गातील तिसरी पाणबुडी INS अरिधमन पुढच्यावर्षी सेवेत दाखल होईल.

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.