Agni Prime Missile: देशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, अग्नी प्राईम मिसाईलची यशस्वी चाचणी
Agni P | तसच याच प्रकारातल्या इतर मिसाईलच्या तुलनेत अग्नी प्राईम (Agni Prime) वजनानं हलकं आणि आकारानं छोटं आहे. ह्या नव्या मिसाईलमध्ये अनेक नव्या तांत्रिक बाबींचा समावेश केला गेलाय.
ओडीशा: ओडीशाच्या तटावर अग्नी प्राईम मिसाईलचं यशस्वी चाचणी करण्यात आलीय. डीआरडीओच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हे मिसाईल 2 हजार किलोमीटरपर्यंत मारा करु शकतं. तसच याच प्रकारातल्या इतर मिसाईलच्या तुलनेत अग्नी प्राईम (Agni Prime) वजनानं हलकं आणि आकारानं छोटं आहे. ह्या नव्या मिसाईलमध्ये अनेक नव्या तांत्रिक बाबींचा समावेश केला गेलाय. सकाळी 10 वाजून 55 मिनिटांना ह्या मिसाईलचं यशस्वी परिक्षण केलं गेलं. (India Successfully Test Fires Agni Prime – New Missile In Agni Series)
शत्रूला धडकी भरवणारं ‘निर्भय’
गेल्या गुरुवारी ओडिशाच्याच चांदीपूर चाचणी रेंज (ITR)वर निर्भय मिसाईलची यशस्वी चाचणी केली गेलीय. निर्भय आण्विक हत्यारं घेऊन जाण्यास सक्षम असं क्रुज मिसाईल आहे. निर्भय मिसाईलची लांबी 6 मीटर आहे तर वजन 1500 किलो. याची मारक क्षमता 1 हजार किलोमीटरपर्यंत आहे. ह्या मिसाईलची चाचणी 10 वाजून 45 मिनिटांनी केली गेली. निर्भयची तुलना अमेरिकेच्या टॉमहॉक आणि पाकिस्तानच्या बाबर मिसाईलशी केली जाते.
India successfully test-fired the Agni-Prime missile today, off the coast of Odisha.
It can hit targets up to a range of 2000 kms, & is very short & light in comparison with other missiles in this class. A lot of new technologies incorporated in the new missile: DRDO officials pic.twitter.com/zq7ffypqFM
— ANI (@ANI) June 28, 2021
रडारवर शत्रूला चकवा देतं निर्भय
जवळपास 300 किलोग्राम आण्विक शस्त्रं घेऊन जाण्याची क्षमता निर्भय मिसाईलमध्ये आहे. हे मिसाईल, जमीन, हवा आणि पाण्यातूनही मारा करण्यास सक्षम आहे. विशेष म्हणजे निर्भय मिसाईलला रडारवर शोधणं शत्रूला कठिण जातं. एवढच नाही तर आपल्या लक्ष्यवर मारा करण्यासाठी निर्भयची अचूकता वाखाणण्याजोगी आहे.
संबंधित बातम्या
Jammu Kashmir : दहशतवाद्यांचा घरात घुसून गोळीबार, माजी SPO सह पत्नी आणि मुलीची हत्या
आता चिनी रणगाड्यांची खैर नाही!, पोखरणमध्ये रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र ‘नाग’ची चाचणी यशस्वी
(India Successfully Test Fires Agni Prime – New Missile In Agni Series)