भारताच्या गेमचेंजरमुळे मालदीवची कोंडी, भारताने घेतला चीन अन् मालदीवला अडचणीत आणणारा निर्णय

India-Minicoy Islands: चीनच्या दबावात येऊन मालदीवकडून भारतीय सैन्य, विमाने, हेलिकॉप्टर माघारी बोलवण्याची मागणी करत होता. मालदीव सरकारच्या मागणीनंतर भारताकडून कुटनितीचा वापर सुरु झाला. त्यानंतर भारताने आणखी एक पाऊल उचलले आहे.

भारताच्या गेमचेंजरमुळे मालदीवची कोंडी, भारताने घेतला चीन अन् मालदीवला अडचणीत आणणारा निर्णय
Follow us
| Updated on: Mar 05, 2024 | 8:22 AM

नवी दिल्ली | दि. 5 मार्च 2024 : भारत आणि मालदीव यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तणाव होता. दोन्ही देशातील संबंध कमालीचे ताणले गेले होते. चीनच्या दबावात येऊन मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनी मालदीवमधून भारतीय सैन्य, विमाने अन् हेलिकॉप्टर माघारी बोलवण्याची मागणी केली होती. परंतु भारताने कुटनीती वापरत मालदीव धडा दिला आहे. यामुळे मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांची कोंडी झाली आहे. भारल मालदीवजवळ असलेल्या लक्षद्वीपमधील मिनिकॉय या ठिकाणी नौदल बेस सुरु करत आहे. यामुळे मालदीवची चांगलीच अडचण होणार आहे.

भारताची रणनीती अशी

मालदीवचे राष्ट्रपती मुइज्जू यांनी चीनला खूश करण्यासाठी भारतीय सैनिकांना देशातून बाहेर जाण्याचे सांगितले. त्यानंतर दोन्ही देशातील संबंध ताणले गेले. आता भारत या भागांत नौदलाचे तळ निर्माण करत आहे. यासंदर्भात नौदलाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली. नौदलाने दिलेल्या वक्तव्यात म्हटले आहे की, मालदीव आणि चीनची जवळीक भारतासाठी चिंता निर्माण करणारी आहे. त्यामुळे भारत आता लक्षद्वीपमधील मिनिकॉय येथे आपले लष्करी तळ सुरु करत आहे. यामुळे या परिसरात भारताच्या निगराणीचा विस्तार होईल. भारताच्या लक्षद्वीप बेटांवर 6 मार्चपासून हा तळ सुरु होणार आहे. सध्याच्या लहान तुकडीला स्वतंत्र नौदल युनिटमध्ये भारतीय नौदल रूपांतरित करणार आहे, असे नौदलाच्या निवेदनात म्हटले आहे.

किती लांब आहे मिनिकॉय

भारताचे लक्षद्वीपमधील मिनिकॉय मालदीवच्या उत्तरेस सुमारे 130 किलोमीटर अंतरावर आहे. या बेटावर नवीन नौदल तळ बांधला गेले आहे. हे तळ मालदीवच्या सर्वात जवळच्या ठिकाणी आहे. तसेच लक्षद्वीपच्या कावरत्ती बेटावर भारतीय नौदलाचा आधीच तळ आहे. परंतु नवीन तळ मालदीवपासून अधिक जवळ असणार आहे.

हे सुद्धा वाचा

विमाने तैनात करणार?

लक्षद्वीपमध्ये नवीन तळ निर्माण करण्याचा अर्थ म्हणजे या ठिकाणी लवकर भारत आपले लढाऊ विमान तैनात करेल. त्यामुळे हिंदी महासागराच्या दक्षिणेकडील भागात भारताची परिस्थिती अधिक मजबूत होईल. मिनिकॉय बेटावर बांधलेला हा नौदल तळ या आठवड्यात भारतीय नौदलाकडे सुपूर्द केला जाणार आहे. या तळाच्या निर्मितीनंतर मालदीव भारताला ब्लॅकमेल करू शकणार नाही, कारण हिंदी महासागरात भारतासाठी त्याचे महत्त्व खूपच कमी राहणार आहे, असे तज्ञांचे मत आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.