India vs Canada | G20 परिषदेत जस्टिन ट्रूडो किती विचित्र वागले, त्याची माहिती आली समोर
India vs Canada | राजघाटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जस्टिन ट्रूडो यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी आपला हात पुढे केला, त्यावेळी त्यांनी खूपच अनपेक्षित कृती केली. कुठल्याही मोठ्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाला हे न शोभणार वर्तन होतं.
नवी दिल्ली : दिवसेंदिवस भारत आणि कॅनडामधील संबंध बिघडत चालले आहेत. भारताने कॅनडामध्ये राहणाऱ्या आपल्या नागरिकांना सतर्कता बाळगण्याच आवाहन केलं आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी कट्टरपंथी हरदीप सिंहच्या हत्येमध्ये भारत सरकार सहभागी असल्याचा आरोप केला आहे. त्यावरुन या सर्व वादाला सुरुवात झालीय. दोन्ही देशांनी परस्परांच्या वरिष्ठ डिप्लोमॅट्सना निष्कासित केलं आहे. जस्टिन ट्रूडो G20 परिषदेसाठी भारतात आले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चर्चा करताना ट्रूडो यांनी निज्जरच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केला होता. भारत आणि कॅनडा दोन्ही देशांनी या मुद्यावर चर्चा झाल्याची पुष्टी केली आहे. कॅनडाच्या पंतप्रधानांनी आमच्या पंतप्रधानांशी बोलताना अशा प्रकारचे आरोप केले होते. ते आम्ही फेटाळून लावले आहेत, असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलय. नुकतीच भारतात जी 20 शिखर परिषद संपन्न झाली. त्यावेळी जस्टिन ट्रूडो यांचं वर्तन चर्चेच विषय बनलं आहे.
टोरंटो येथील प्रकाशक सिटी न्यूज एवरीव्हेयर एक रिपोर्ट प्रकाशित केलाय. त्यानुसार, G20 शिखर परिषदेच्यावेळी दिल्लीत राजघाटवर पुष्पांजली वाहण्याचा कार्यक्रम झाला. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी जस्टिन ट्रूडो यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी आपला हात पुढे केला. पण ट्रूडो यांनी आपला हात मागे खेचून घेतला. पीएम मार्क रुटे, यूकेचे पीएम ऋषि सुनक आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅनुएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी हस्तांदोलन केलं. भारताच्या राष्ट्रपतींनी G20 देशांच्या प्रमुखांसाठी डिनरच आयोजन केलं होतं. त्यामध्ये सुद्धा ट्रूडो सहभागी झाले नाहीत. ट्रूडो डिनर कार्यक्रमात का सहभागी झाले नाहीत? त्या बद्दल पंतप्रधान कार्यालयाने सुद्धा काही सांगितलं नाही. अजून जस्टिन ट्रूडो यांनी भारत दौऱ्यात काय केलं?
G20 शिखर परिषदेतील ग्लोबल बायोफ्यूल अलायन्सच्या लॉन्चमध्येही जस्टिन ट्रूडो सहभागी झाले नाहीत. पंतप्रधान मोदी, अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन, ब्राझीलचे राष्ट्रपती लुइज़ इनासियो, अर्जेंटीनाचे अल्बर्टो फर्नांडीज, इतालवीचे पीएम जियोर्जिया मेलोनी यांनी मिळून हे लॉन्च केला. सध्या भारत आणि कॅनडाचे संबंध प्रचंड ताणले गेले आहेत. याचा परिणाम दोन्ही देशातील व्यापार, शिक्षण क्षेत्रावर होणार आहे. जस्टिन ट्रूडो सरकार कॅनडामध्ये भारतविरोधी कारवाया करणाऱ्या खलिस्तान्यांना पाठिंबा देतं. हाच भारत सरकारचा मुख्य आक्षेप आहे. त्यावरुन हा सर्व वाद आहे.