Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Canada issue | कॅनडा विरुद्ध मोदी सरकारची आतापर्यंतची सर्वात मोठी Action, VIDEO

India vs Canada issue | भारत आता नाही ऐकणार, जशास तसं उत्तर मिळणार. भारतातील मोदी सरकारने कॅनडाच्या जस्टिन ट्रूडो सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. कॅनडातून भारतविरोधी कारवाया चालतात.

India vs Canada issue | कॅनडा विरुद्ध मोदी सरकारची आतापर्यंतची सर्वात मोठी Action, VIDEO
pm justin trudeau behaviour with pm narendra modi in g20 summit not good
Follow us
| Updated on: Sep 21, 2023 | 12:36 PM

नवी दिल्ली : G20 परिषदेनंतर भारत आणि कॅनडामधील संबंध आणखी बिघडले. दिवसेंदिवस हे संबंध आणखी खराब होत चालले आहेत. दोन्ही देशांनी आधी परस्परांच्या डिप्लोमॅट्सवर कारवाई केली. या सगळ्या तणावाचा दोन्ही देशातील व्यापारी संबंधांवर परिणाम होणार आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निरजरच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केला. त्यानंतर हा वाद आणखी वाढला. G20 परिषदेसाठी जस्टिन ट्रूडो भारतात आले होते. त्यावेळी सुद्धा त्यांचं वर्तन खूपच अनपेक्षित होतं. दिल्लीत राजघाटवर पुष्पांजली वाहण्याचा कार्यक्रम झाला. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी जस्टिन ट्रूडो यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी आपला हात पुढे केला. पण ट्रूडो यांनी आपला हात मागे खेचून घेतला. त्याशिवाय भारताच्या राष्ट्रपतींनी G20 देशांच्या प्रमुखांसाठी डिनरच आयोजन केलं होतं. त्यामध्ये सुद्धा ट्रूडो सहभागी झाले नाहीत.

जस्टिन ट्रूडो मायदेशी परतल्यानंतर त्यांनी दोन्ही देशाच्या व्यापारी संबंधांवर परिणाम होतील, असे काही निर्णय घेतले. भारताने सुद्धा कॅनडाला त्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे दिवसेंदिवस दोन्ही देशातील संबंध आणखी खराब होत चालले आहेत. भारताने आता कॅनडाविरोधात सर्वात मोठ पाऊल उचललं आहे. भारताने कॅनडाच्या नागरिकांसाठी व्हिसा सेवा बंद केली आहे. भारताकडून आतापर्यंतची ही सर्वात मोठी Action आहे. “पुढील सूचना मिळेपर्यंत कॅनडाच्या नागरिकांसाठी व्हिसा सेवा स्थगित करण्यात आली आहे” असं भारताने म्हटलं आहे. खालिस्तान समर्थक हरदीप सिंह निज्जरच्या हत्येनंतर वाद वाढत चालला आहे. सर्वप्रथम कॅनडाने भारताविरोधाक स्टेटमेंट देण्यास सुरुवात केली. कॅनेडियन पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर गंभीर आरोप केले. निज्जरच्या हत्येसाठी भारताला जबाबदार धरलं. गुरपतवंत सिंह पन्नूच्या समर्थकांनी काय केलं?

भारताने कॅनडाला चाललेल्या सर्व नागरिकांना सावध राहण्याची सूचना केली आहे. तिथे राहणाऱ्या भारतीयांना सुद्धा सर्तक राहण्यास सांगितलं आहे. कॅनडामध्ये भारतविरोधी कारवाया, गुन्हे वाढत चालले आहेत. त्या पार्श्वभूमीवर एडवायजरी जारी करण्यात आली आहे. कॅनडातील खासदार चंद्रा आर्य यांनी दावा केला होता की, गुरपतवंत सिंह पन्नूच्या समर्थकांनी कॅनडामध्ये राहणाऱ्या हिंदू नागरिकांना लक्ष्य केलं.

गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.